सेलिब्रिटी शेफचा मृतदेह घरातील किचनमध्ये आढळला; मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही गूढ
Jagee John (Photo Credits: Instagram)

Jagee John Death: प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह राहत्या घरातील किचनमध्ये सापडला आहे. जगी ही तिच्या ‘जगीझ कूकबुक’ या कुकरी शोमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर होती. परंतु, तिचा मृतदेह सापडल्याने सगळीकडेच खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप पोलिसांना देखील कळलेलं नाही.

जगी ही केरळ राज्यातील कुर्वणकोनममध्ये तिच्या आईसोबत राहत होती. सुमारे दुपारी चार वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह तिच्या मित्रांना सापडला आहे. लगेचच त्यांनी ही माहिती जवळच्या पोलीस स्थानकाला दिली.

मुख्य म्हणजे तिच्या शरीरावर कोणतीही जखम आढळलेली नसल्यामुळे पोलिसांनी तिची बॉडी पोस्टमॉर्टेमसाठी पाठवली आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच जगीच्या मृत्यूचं कारण नेमका काय होतं हे स्पष्ट होईल.

जगी जॉनचा मृत्यू झाला तेव्हा ती 45 वर्षांची होती. तिचा जन्म सौदी अरेबिया या देशात झाला आहे. नंतर इंग्लंड, यूएस आणि भारत या तीन देशांमध्ये तिचं शिक्षण झालं आहे.

धक्कादायक! हिसारमध्ये शिक्षकांनी केला 40 मुलींचा विनयभंग; लैंगिक छळाला कंटाळून विद्यार्थिनीने खाल्ले विष

दरम्यान, सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॅन फॉलोईंग पाहायला मिळते. इन्स्टाग्रामवर तर जगी प्रचंड लोकप्रिय होती. तिने नाताळच्या निमित्ताने रविवारी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी एक पोस्ट लिहिली होती जी तिची अखेरची पोस्ट ठरली. जागीच्या जाण्याने अनेक फॅन्सनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे.