‘Pushpa 2 – The Rule’ Box Office Collection Day 2: दक्षिण चित्रपटाचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ॲक्शन ड्रामा चित्रपट 'पुष्पा 2' च्या (Pushpa 2) कमाईने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. सुमारे 350 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या 'पुष्पा 2' ने पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमधूनच 90 टक्के बजेट कव्हर केले. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. पुष्पा 2 ने पहिल्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 175 कोटींचा व्यवसाय केला. त्याचबरोबर 'पुष्पा 2' चित्रपटाने भारताच्या हिंदी भाषेत पहिल्याच दिवशी 72 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कलेक्शन केले जाणून घेऊयात.(‘Pushpa 2 – The Rule’ Box Office Collection Day 1: 'पुष्पा-2' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'जवान'चा रेकॉर्ड मोडला: 175.1 कोटींची एतिहासीक ओपनिंग)
पुष्पा 2 ची भारतात 250 कोटींहून अधिक कमाई
पुष्पा 2 ने पहिल्याच दिवशी भारतातील सर्व भाषांमधून 174.9 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी पुष्पाने भारतात 90.10 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. SACNL च्या म्हणण्यानुसार, दोन दिवसात भारतातील पुष्पाच्या निव्वळ कलेक्शनने 250 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2 चे एकूण कलेक्शन 265 कोटी रुपये झाले आहे. पुष्पा 2 ने दोन दिवसांत जगभरात 400 कोटींचा आकडा पार केला आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईसह पुष्पा 2 ने शाहरुख खानच्या जवान या चित्रपटासह सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले.
Box Office: Allu Arjun's Pushpa 2 Enters Rs 400 Crore Club (Globally) https://t.co/yomE7bzLxA pic.twitter.com/GV0CIWi7w8
— NDTV Movies (@moviesndtv) December 7, 2024
सर्व भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
पुष्पा 2 ने राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर मास ॲक्शन फिल्म आरआरआरच्या ओपनिंग डे कलेक्शनचा 225 कोटी रुपयांचा विक्रम मोडला आहे. पुष्पा जगभरातील, भारतीय आणि दक्षिण सिनेमातील सर्वात मोठी ओपनींग मिळालेला सिनेमा ठरला. सुकुमार दिग्दर्शित पुष्पा हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. 'पुष्पा' हा चित्रपट आज रिलीजच्या तिसऱ्या दिवशी आणि वीकेंडमध्ये 500 कोटींहून अधिक कमाई करेल असे सांगितले जात आहे.