
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाची मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने उद्या 20 मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. घटस्फोटाबाबत अंतिम निर्णय देण्यासाठी वांद्रे कौंटुबिक न्यायालयाला विनंती केली आहे. उच्च न्यायालयाने 6 महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी देखील माफ केला आहे. यासाठी दोघांनीही परस्पर संमतीने याचिका दाखल केली होती. खरं तर, घटस्फोटासाठी परस्पर याचिका दाखल केल्यानंतर, समेट आणि पुनर्मिलनासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला जातो. परंतु जेव्हा अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. तेव्हा न्यायालय ती रद्द करू शकते. त्यामुळे दोघांमधील पती-पत्नीचे नाते उद्या संपण्याची शक्यता आहे.
न्यायालयाने घाई का दाखवली?
आयपीएल 22 मार्चपासून सुरू होईल. तर 25 मार्च रोजी पंजाब किंग्ज त्यांचा पहिला सामना खेळेल. या काळात, चालू हंगामात पंजाबकडून युजवेंद्र चहल देखील खेळणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने तो या स्पर्धेत व्यस्त राहील. चहलच्या व्यस्त तारखा लक्षात घेऊन, उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाला घटस्फोटाच्या याचिकेवर 20 मार्चपर्यंत अंतिम निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत.
अडीच वर्षे वेगळे राहीले
बार अँड बेंचच्या अहवालात असे उघड झाले आहे की चहल आणि धनश्री गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांनी खूप आधीच त्यांचे मार्ग वेगळे केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे चहल आणि धनश्री आता एकत्र नसल्याच्या वृत्तावर शुक्का मोर्तब झाला आहे. दोघांनीही 5 फेब्रुवारी रोजी कौटुंबिक न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये परस्पर संमतीने घटस्फोट मिळावा अशी मागणी करण्यात आली होती.
चहलला 4.75 कोटी पोटगी द्यावी लागेल
पोटगीबाबत दोघांमध्ये परस्पर करार झाला आहे. याअंतर्गत, युजवेंद्र चहल धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये देणार आहेत. कुटुंब न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, त्याने यापैकी 2.36 कोटी रुपये आधीच दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, दोघांमधील करारानुसार, घटस्फोटाच्या आदेशानंतरच पोडगीचा दुसरा हप्ता द्यावा लागेल.
[BREAKING] Bombay High Court orders family court to decide divorce case of Yuzvendra Chahal, Dhanashree Verma tomorrow; waives cooling-off period @yuzi_chahal
Read details here: https://t.co/zpY5ac0790 pic.twitter.com/ay2xGUiYKU
— Bar and Bench (@barandbench) March 19, 2025
दोघांचा 5 वर्षांपूर्वी संसार सुरू झाला होता. कोविड महामारीच्या काळात, डान्स कला शिकण्यासाठी चहल धनश्रीकडे प्रशिक्षण घेत होता. नंतर त्यांच्यात जवळीक वाढली आणि नंतर ते प्रेमात पडले. चहल आणि धनश्रीचे लग्न 22 डिसेंबर 2020 रोजी झाले. त्यानंतर, हे नाते 2 वर्षही टिकले नाही. 2 वर्षात ते वेगवेगळे राहू लागले.