देशभरात कोरोना व्हायरसमुळे सरकारने लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले होते. तसेच कोरोनावर अद्याप कोणतेच औषध मिळाले नसले तरीही सरकार कडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घेण्यास सांगितले आहे. तर जवळजवळ दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर काही गोष्टी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये मनोरंजन क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शूटिंग सुरु करण्यात आले आहेत. याच दरम्यान आता मनोरंजन क्षेत्रातील 65 वर्षावरील व्यक्तींना काम करण्याची परवानगी बॉम्बे हायकोर्टाने दिली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील शूटिंग जरी सुरु झाले असले तरीही सर्व नियम आणि अटींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत काम करताना सोशल डिस्टंन्सिंगचा सुद्धा वापर करणे अनिवार्य असल्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आता 65 वर्षावरील व्यक्तींना चित्रपटांच्या सेटवर काम करण्याची परवानगी दिली आहे. परंतु बालकलाकारांना अद्याप सेटवर येऊन शुटिंग करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. कोरोनाची स्थानिक परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचसोबत बॉम्बे हायकोर्टाने राज्य सरकारचे आदेश बाजूला सारत हा निर्णय जाहीर केला आहे.(Disha Patani Father Tested Covid-19 Positive: दिशा पटानी हिचे वडील जगदीश पटानी यांना कोरोना व्हायरसची बाधा)
Bombay High Court allows all persons above 65 years of age working in the entertainment industry to work on a film set. The court sets aside the state government order.
— ANI (@ANI) August 7, 2020
दरम्यान, लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती पाहता अद्याप सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होते ते निर्मात्यांकडून OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच कोरोनाच्या संकटकाळात काम नसल्याने सर्वच कलाकारांना चिंता सतावत आहे. परंतु स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी ते सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येत आहेत.