ZERO Poster : शाहरूख खानने शेअर केले 'झिरो' सिनेमाचे पोस्टर्स, 2 नोव्हेंबरला येणार ZERO चा ट्रेलर
अनुष्का शर्मा, शाहरुख खान,कैटरीना कैफ (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा किंग शहा शाहरूखचा आगामी सिनेमा 'जिरो' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर शाहरूखच्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित होणार आहे. शाहरूख सोबतच त्याचे चाहतेदेखील या सिनेमासाठी उत्सुक आहेत. ट्रेलर लॉन्चपूर्वी शाहरूखने या सिनेमाची दोन पोस्टर्स रसिकांच्या भेटीला आणली आहेत. एका पोस्टरमध्ये शाहरूखसोबत कॅटरीना कैफ आणि दुसर्‍या फोटोमध्ये शाहरूख खानसोबत अनुष्का शर्मा झळकली आहे.

शाहरूखने शेअर केलेल्या पोस्टर्समध्ये त्याने अनुष्कासोबतच्या पोस्टरखाली 'या जगात माझ्या बरोबरीची केवळ एकच आहे.' असे लिहले आहे. त्यामध्ये यामध्ये शाहरूख आणि अनुष्का व्हील चेअरवर मस्ती करताना दिसले आहेत.

 

View this post on Instagram

 

Iss poori duniya mein, meri barabari ki ek hi toh hai... #ZeroPoster @anushkasharma @aanandlrai @RedChilliesEnt @cypplofficial

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

शाहरूखने अनुष्काप्रमाणेच कॅटरिनासोबतचं एक पोस्टरदेखील शेअर केलं आहे. यामध्ये 'चांदण्यांना स्वप्नात पाहणार्‍यांनो ! मी तर चंद्राला जवळून पाहिले आहे. ' असे कॅप्शन शेअर केले आहे. एका बुटक्या व्यक्तीच्या व्यक्तिरेखेमध्ये शाहरूख सिनेमात दिसत आहे.

'झिरो' सिनेमा आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा 21 डिसेंबर 2018 रोजी रिलीज होणार आहे. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त जोरदार तयारी सुरु; असा सजला शाहरुखचा अलिशान 'मन्नत'