Pushpa: तीन मिनिटांच्या आयटम साँग साठी 'समंथा'ने घेतेले 'ऐवढे' मोठे मानधन, किंमत ऐकुण तुम्ही व्हाल थक्क
(Photo Credit - Instagram)

साउथ सुपरस्टार अल्लु अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) बाॅक्स ऑफिसवर हिट ठरला. तसेच, चित्रपटाच्या कथेपासून ते गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आवडत आहेत. सामी गाण्याप्रमाणेच 'ओ अंतवा' या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. या गाण्यातील अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu) हावभाव, तिचा अभिनय आणि तिचा उत्तम डान्स यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले आहेत. या चित्रपटामधील हे एकमेव गाणे होते ज्यात समंथाने डान्स केला आहे. पण, तिचे हे मानधन एका चित्रपटाच्या मानधना एवढे आहे. या 3 मिनिट 49 सेकंदाच्या गाण्यासाठी सामंथाने किती मानधन घेतले हे तुम्हाला माहिती आहे का? या गाण्यासाठी संमथाने एक-दोनऐवजी पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'ऊ अंतवा' गाण्यासाठी समंथाने खूप मोठे मानधन घेतले आहे. सुरुवातीला तिला या गाणयात काम करायचे नव्हते. हे गाणे आपल्यासाठी नाही असे तिला वाटले. अखेरीस, चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनने तिला या गाण्यासाठी समजावले आणि तिने या गाण्यासाठी होकार दिला. 3 मिनिट 49 सेकंदाच्या त्या गाण्यासाठी तिने सुमारे 5 कोटी रुपये घेतल्याचे वृत्त आहे. तसेच, सुरुवातीला तिला या गाण्यातील काही स्टेप्स आवडल्या नाहीत. पण हळुहळु तिला या स्टेप्स आवडू लागल्या, मग तिने एकही स्टेप्स बदलायला सांगितले नाही. आता 'पुष्पा: द राइज'च्या दुसऱ्या भागासाठी समंथाच्या आणखी एका गाण्याचा विचार केला जात आहे. (हे ही वाचा Akshay Kumar चा Bachchan Pandey चित्रपट होळीच्या मुहूर्तावर 'या' दिवशी होणार चित्रपटगृहात प्रदर्शित)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

दरम्यान, या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओने डिसेंबरमध्ये 100 दशलक्ष व्ह्यूज पार केले. पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, समंथाने अल्लू अर्जुन आणि पुष्पाच्या टीमचे आभार मानण्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केले आहे. गाण्यातील एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'मी हिरोईन, व्हिलन, कॉमेडीयन आणि गंभीर व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, मी चॅट शो होस्टही होते. पण सेक्सी दिसणे खरोखर कठीण आहे. या गाण्यावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद असे तिने म्हटले आहे.