Supreme Court: तुम्ही देशातील तरुणांची मानसिकता दुषित करीत आहात, सर्वोच्च न्यायालयाने निर्माती एकता कपूरला फटकारलं

निर्माती एकता कपुरची (Ekta Kapoor) आणखी एक वेब सिरिझ (Web Series) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावेळी तर थेट सर्वोच्च न्यायालयानेचं (Supreme Court) एकता यांना खडे बोल सुणावले आहेत. कारण ठरली ते अल्ट बालाजी (Alt Balaji) या ओटीटी प्लाटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित झालेली वेबसिरिज (Web Series) ट्रीपल एक्स (XXX). या वेबसिरिजमध्ये भारतीय सैनिकांचा (Indian Army) अपमान करणारी काही दृश्य दाखवण्यात आली आहे ज्याबाबत एकता कपुर विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या पुर्वीही याचं पध्दतीच्या प्रकरणात एकता विरोधात या प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती. पण यावेळी मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकता कपुर यांची चांगलील कानउघडणी केली आहे. 'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात' असं म्हणत सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला झापलं आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटलं आहे की, लोकांना हे तुम्ही मनोरंजनासाठी (Entertainment) कशा प्रकारचे पर्याय देत आहात.  प्रत्येक वेळी तुम्ही या कोर्टात येता,यापुढे अशी याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड (Fine) करू. फक्त तुम्ही एक चांगला वकील (Lawyer) घेऊ शकता. हे न्यायालय प्रभाव असलेल्या लोकांसाठी नाही तर आवाज नसलेल्यांसाठी काम करते. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल तर विचार करा सामान्य माणसाची अवस्था काय असेल, असं कोर्टानं म्हटलं. (हे ही वाचा:- Mirzapur 3 वर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याकडून तक्रार मागे घेण्याचे आदेश)

 

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) टिपण्णी नुसार याबाबत काही तरी करायला हवं. आपण या देशातील तरुण पिढीचे मानसिकता दूषित करत आहात. OTT सामग्री सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना मनोरंजनासाठी कशा प्रकारचे पर्याय देत आहात? याशिवाय तुम्ही तरुणांचे मनं प्रदूषित करत आहात, असा सवाल विचारत सर्वोच्च न्यायालयाने निर्माती एकता कपुरला झापलं आहे.