Year Ender 2019: कपिल शर्मा, एकता कपूर आणि 'हे' सेलेब्स बनले 2019 मध्ये पालक
Kapil Sharma, Ekta Kapoor (Photo Credits: Instagram)

Bollywood Actors Who Became Parents: 2019 हे वर्ष मनोरंजन सृष्टीतील प्रत्येकासाठी चांगलं वर्ष ठरलं आहे निदान कामाच्या बाबतीत. यावर्षी अनेक नवीन टॅलेंटेड लोक आणि चांगल्या दर्जाचं कन्टेन्ट प्रेक्षकांच्या भेटीला आलं. इंडस्ट्रीमधील बर्‍याच लोकांसाठी वैयक्तिकरित्या हे एक चांगले वर्ष होते, कारण त्यांच्यापैकी बर्‍याच जणांनी आपल्या कुटुंबात नवीन सदस्यांचे स्वागत केले. काहींनी आनंदाने सर्वांना चांगली बातमी सांगितली, तर काहींनी याबद्दल मौन बाळगलं. आता 2019 चा शेवट जवळ येत आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सेलेब्सच्या रिअल लाईफमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील झालेल्या मुलांची यादी.

एकता कपूर

एकता कपूरने ने तिच्या मुलाला म्हणजेच रवी कपूरला सरोगसीद्वारे जन्म दिला आहे. तिने तिच्या भावाकडून म्हणजेच तुषार कपूरकडून प्रेरणा घेतली आहे. कारण त्याने ही सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला होता. एकताने घोषणा केली की तिच्या मुलाचा जन्म 27 जानेवारी 2019 रोजी झाला.

कपिल शर्मा

कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी 10 डिसेंबर 2019 रोजी आपल्या मुलीचे स्वागत केले. कपिलला सोशल मीडियाद्वारे अनेक फॅन्सनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जय भानुशाली

जय भानुशाली आणि माही विज यांच्या लग्नाला जवळपास 8 वर्ष पूर्ण झाल्यावर 21 ऑगस्ट 2019 रोजी त्यांनी आपल्या मुलीचे स्वागत केले आहे. त्यांनी आपल्या बाळाचे नाव तारा ठेवले आहे. जय भानुशाली आणि माही विज यांनी आपल्या मुलीसह पहिली दिवाळी साजरी केली. 25 डिसेंबर 2019 रोजी त्यांनी आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर करणार असल्याचेही चाहत्यांना सांगितले आहे.

ईशा देओल

10 जून 2019 रोजी ईशा देओल आणि भरत तख्तानी या जोडीने त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आणि एक क्युट फोटोद्वारे सोशल मीडियावर आपल्या फॅन्सना याची माहिती दिली. ईशाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तख्तानी कुटुंब हिंदुजा हॉस्पिटल, खार बाहेर आपल्या छोट्या बाळासह मीडियाच्या समोर आले.

Year Ender 2019: कंगना रणौत आणि तिची बहीण ते करण जोहरच्या घरातील पार्टी, या आहेत या वर्षीच्या Bollywood Controversies

Year Ender 2019:बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केलेले बॉलिवूडचे चित्रपट

एमी जॅक्सन 

एमीने 23 सप्टेंबर रोजी तिच्या बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वत:चा जॉर्ज आणि अँड्रियाजचा एक मोहक फोटो शेअर केला आणि लिहिले, "आमची परी, या जगात आपले स्वागत आहे एंड्रियास" या फोटोमध्ये जॉर्ज एमीलस किस करताना दिसतो जेव्हा ती तिच्या बाळाला दूध पाजत आहे.