ऑस्करसाठी नामांकन मिळवलेल्या मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांचा आज 57 वा वाढदिवस... त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहेत. अगदी मोजक्या चित्रपटातून स्वत:ची छाप मांडणा-या या दिग्दर्शकाने आतापर्यंत एकाहून एक सरस चित्रपट भारतीय प्रेक्षकांना दिले. 'लगान' चित्रपटाने त्यांनी खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी हळू हळू करत यशाचे शिखर गाठले आणि बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे स्थान निर्माण केले. आशुतोष गोवारीकर यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1964 मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात झाला. लहानपणापासून आशुतोष गोवारीकर अत्यंत हुशार होते.
दिग्दर्शक म्हणून चित्रपटात काम करण्यापूर्वी आशुतोष गोवारीकर अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यांनी सर्कस, भारत एक खोज यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. त्याचबरोबर त्यांनी CID मध्येही काम केले आहे. मात्र त्यांची अभिनेता म्हणून खरी सुरुवात झाली ती 1984 साली आलेल्या 'होली' या चित्रपटातून...हेदेखील वाचा- जेव्हा Priyanka Chopra साठी Hrithik Roshan बनला होता रियल लाइफ सुपर हिरो
विशेष ज्या कलाकारासोबत चित्रपट करुन दिग्दर्शकआशुतोष यांनी ऑस्करमध्ये नामांकन मिळवले त्याच कलाकारासोबत त्यांनी बॉलिवूडमध्ये पहिला चित्रपट केला. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून परफेक्शनिस्ट आमिर खान... किंबहुना आमिर खान याचाही 'होली' हा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटात आमिर खान, आशुतोष गोवारीकरसह परेश रावल, नसिरुद्दीन शाह, श्रीराम लागू, दीप्ती नवल, ओम पुरी यांसारखी तगडी स्टारकास्ट होती.
आशुतोष गोवारीकर यांनी जोधा अकबर, पानिपत, व्हॉट्स युअर राशी, स्वदेस, मोहंजोदाडो यांसारखे बरेच हिट चित्रपट दिले. चित्रपटाच्या कथेवरील त्यांचा अभ्यास, भाषेवर प्रभुत्व, दिग्दर्शनाची उत्तम जाण या कलागुणांची कल्पना त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून झळकते. अशा या हरहुन्नरी कलाकार, दिग्दर्शकाला लेटेस्टली कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!