द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाने सुरु झालेला वाद काहीसा निवळतो तोच 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) चित्रपटाने रणकंदन माजवले. ते कमी होते न होते तोच 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' (The Diary of West Bengal) चित्रपटाने वाद सुरु केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे हा चित्रपट ट्रेलर रिलीज होताच वादात सापडला आहे. सिद्ध चित्रपट निर्माते सनोज मिश्रा हे चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहात आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41A अन्वेय पाठवलेल्या नोटीशीमध्ये 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटातून राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोटीसनुसार चित्रपटाच्या दिग्दर्शकाला येत्या 30 मे रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटाची कथा रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी अतिरेकी यांच्या वस्तीभोवती फिरते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारने मतपेढीच्या राजकारणासाठी पश्चिम बंगालमध्ये समुदायाचा झपाट्याने कसा वापर केला आहे हे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाद्वारे बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. आजूबाजूला झालेल्या गदारोळामुळे हा चित्रपट सध्या सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. (हेही वाचा, 'गदर: एक प्रेमकथा' 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षांच्या भेटीला, नऊ जून पासून चित्रपटगृहात प्रदर्शित)
ट्विट
Maharashtra | West Bengal Police issues notice to the director of the Hindi film "The Diary of West Bengal", alleging that the director is trying to defame Bengal with this film.
Presented by Wasim Rizvi Films, The Diary of West Bengal is produced by Jitendra Narayan Singh and…
— ANI (@ANI) May 26, 2023
नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, तुम्हाला (दिग्दर्शक) 30 मे 2023 रोजी एमहर्स्ट स्ट्रीट पोलीस स्टेशनचे अतिरिक्त प्रभारी अधिकारी इंस्पेक्टर सुभब्रत कार, 56, एम्हर्स्ट स्ट्रीट पोलीस स्टेशन, राजा राम मोहन यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरानी, कोलकाता-9 वरील संदर्भित प्रकरणाच्या तपासाच्या हेतूने. प्रभारी निरीक्षक, ओशिवरा पोलीस स्टेशन, मुंबई यांना नोटीस बजावण्यासाठी आणि रिटर्न सिग्नलद्वारे सेवेची माहिती देण्यासाठी.
दरम्यान, वादग्रस्त चित्रपट वसीम रिझवी फिल्म्सने प्रस्तुत केला आहे आणि जितेंद्र नारायण सिंग निर्मित आहे, तपस मुखर्जी आणि अचिंत्य बोश सह-निर्माते म्हणून काम करत आहेत.