100 Crore Club: वालीमाई आणि भीमला नायक 100 कोटी क्लबच्या दिशेने वाटचाल, आलियाचा गंगूबाईच्या शर्यतीत मागे
(Photo Credit - TW)

साऊथ सुपरस्टार (South Superstar) अजित कुमारचा (Ajith Kumar) बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट वालीमाई (Valimai) सिनेमागृहात पोहोचला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या आगामी बुकिंगचे आकडेही उत्कृष्ट आहे. पहिल्या दिवशी, चित्रपटाने एकट्या तामिळनाडू बॉक्स ऑफिसवर (Tamil Nadu Box Office) सुमारे 36.17 कोटींची कमाई केली. दुसरीकडे, दुस-या दिवशी 24.62 कोटींचा बिझनेस झाला तर तिसर्‍या दिवसाच्या बिझनेसबद्दल बोलायचे झाले तर वालीमाईने जवळपास 16 कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीने पहिल्या दोन दिवसांत केवळ 23 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, भीमला नायकनेही बॉक्स ऑफिसवर 79 कोटींचा व्यवसाय केला आहे.

वालीमाई या चित्रपटाचे बजेट 160 कोटी 

साऊथ सुपरस्टार अजित कुमार आणि हुमा कुरेशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'वालीमाई द पॉवर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अजित कुमार यांच्या चाहत्यांना त्यांचा चित्रपट खूप आवडतो. दिग्दर्शक एच विनोद आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या या चित्रपटाचे बजेट अंदाजे 160 कोटी इतकी आहे. तर या चित्रपटाच्या चांगल्या कामगिरीमुळे लवकरच हा चित्रपट आपली किंमत वसूल करेल असे बोलले जात आहे. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी तामिळनाडू थिएटर राइट्सद्वारे 62 कोटी रुपये कमावले होते. केरळ आणि कर्नाटकमध्येही या चित्रपटाने थिएटरचे हक्क विकून 3.5 आणि 5.5 कोटी रुपये कमवले. (हे ही वाचा Sanam Teri Kasam 2: अभिनेता हर्षवर्धन राणेचा 'सनम तेरी कसम 2' हा चित्रपट यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार प्रदर्शित)

अजित कुमार यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. हा चित्रपट जगभरात 4500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. व्यापार तज्ज्ञांच्या मते, तामिळनाडूतील बहुतांश शहरांमधून कमाईचे जुने रेकॉर्ड मोडले गेले आहेत. हे दोन्ही चित्रपट गेल्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले होते आणि दोन्ही चित्रपट प्रचंड हिट ठरले होते.

 पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

वालीमाई हा एक फुल ऑन मसाला अॅक्शन चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन एच विनोद यांनी केले आहे. ही कथा आहे एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची जो बाईक गँगशी लढतो. तमिळसोबतच हा चित्रपट हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांनी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिला असला तरी त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.