Taimur Ali Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपल्या पत्नी आणि मुलासह एका धर्मशाळेमध्ये दिवाळीची सुट्टी एन्जॉय करत आहे. पत्नी करीना कपूर (Kareena Kapoor) आपल्या बेबी बंपसहित आपला मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि पती सैफसह मस्त धमालमस्ती करताना दिसत आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये मुलगा तैमुर मोठ्या आवाजात हॅप्पी बर्थडे गाणे (Happy Birthday Song) बोलताना दिसत आहे. यंदा दिवाळीत सर्व सेलिब्रिटींनी दरवर्षी प्रमाणे धुमधडाक्यात दिवाळी साजरी न करता अत्यंत साधेपणाने दिवाळी साजरी केली. त्यामुळे करीनाने देखील अगदी साधेपणाने यंदा दिवाळी साजरी केली. ज्यात ती आपल्या कुटूंबासह धर्मशाळेत मजा करताना दिसत आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात तैमूर वाढदिवसाचे गाणे गाताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तैमूर, करीना आणि सैफ कोणाचा तरी वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. यात ती व्यक्ती केक कापत असताना सर्वजण हॅप्पी बर्थडे गाणे गाताना दिसत आहे. यात तैमूरच्या गाण्याने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेदेखील वाचा- Happy Diwali: अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टीसह 'या' कालाकारांनी दिवाळीसाठी चाहत्यांसाठी सोशल मीडियात पोस्ट करत दिल्या खास शुभेच्छा

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून यात त्याचे बाबा सैफ अली खान त्याला हळू आवाजात गाणे बोल असे सांगताना दिसत आहे.

लवकरच करीना आपल्या दुस-या मुलाला जन्म देणार असून या गोड बातमीने त्यांचे संपूर्ण कुटूंब प्रचंड उत्साही आहे. सोशल मिडियावर तिचे बेबी बंपसहित बरेच फोटो व्हायरल होत आहे. तसं करिना आपल्या बेबी बंपला मिडियासमोर खूप उत्तमरित्या कॅरी करते हे आपण तैमूरच्या वेळेस सर्वांनी पाहिले.

तर दुसरीकडे सैफ अली खान 'भूत पुलिस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तो जॅकलीन फर्नांडिज आणि यामी गौतम सह दिसणार आहे.