विंदू दारा सिंह ने शेअर केला COVID-19 विरुद्ध लढणा-या कस्तुरबा रुग्णालयातील नर्सेसचा व्हिडिओ, सत्य परिस्थितीची जाणीव करुन देणारा आणि मोलाचा संदेश देणारा हा Viral Video नीट ऐका
Vindu Dara Singh (Photo Credits: Twitter)

संपुर्ण देश हा कोरोना व्हायरस विरुद्ध मोठी लढाई लढत आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सर्व शासकीय आणि वैद्यकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यात सर्वात मोठी तारेवरची कसरत करावी लागतेय ती रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांना हाताळणा-या डॉक्टर, नर्सेस आणि अन्य कर्मचा-यांची. हा आजार लोकांना होऊ नये यासाठी लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. मात्र अनेक लोक हा लॉकडाऊन गांभीर्याने घेत घराबाहेर सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. ज्याचा परिणाम कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर दिसून येत आहे. म्हणून अशा बेजबाबदार लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी आणि सत्य परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयातील (Kasturba Hospital) नर्सेसचा एक व्हिडिओ अभिनेता विंदू दारा सिंह (Vindu Dara Singh) याने शेअर केला आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून या नर्सेसने रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डमधील गंभीर परिस्थिती सांगितली आहे. त्यासोबत घराबाहेर न पडण्याचा आणि नियमांचे पालन करण्याचा संदेश जनतेला दिला आहे.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- महाराष्ट्रात Lock Down वाढणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' उत्तर

बाहेरून आणलेल्या फळभाज्या, पालेभाज्या मीठाच्या पाण्यात धुतल्याशिवाय फ्रिजमध्ये ठेवू नका. दुधाच्या पिशव्या नीट धुवून फ्रिजमध्ये ठेवा. आठवड्यातून एकदाच बाजारात जा. चहाऐवजी हळद, काळी मिरी, लवंगाचा काढा प्या असा सल्ला देखील त्यांनी नागरिकांना दिला आहे.

महाराष्ट्रात सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी ही देशात सर्वाधिक आहे. आज शनिवारी सुद्धा मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यांमधून कोरोनाचे 47 नवे रुग्ण समोर आल्याने कोरोना बाधितांचा आकडा हा 537 वर गेला आहे. याविषयी उद्धव ठाकरे यांनी भाष्य करताना लोकांच्या चाचणीची संख्या वाढल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय असे सांगितले.