Sherni Movie (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिचा बहुचर्चित चित्रपट 'शेरनी' लवकरच प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. डायरेक्ट-टू-स्ट्रीम हिंदी अमेझॉन ओरीजनल सिनेमा 'शेरनी'चा ग्लोबल प्रीमियर पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आज अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या वतीने करण्यात आली. आपल्या शैलीसाठी चर्चेत असलेला फिल्ममेकर अमित मसुरकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक असून अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्माती आहे.

'शेरनी' या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हेदेखील वाचा- Radhe: सलमान खानला धक्का; IMDB वर राधेला मिळाले फक्त 1.9 रेटिंग, भाईजानच्या करियरमध्ये दुसऱ्यांदा सर्वात कमी Rating

आगामी अमेझॉन ओरीजनल मुव्हीबद्दल बोलताना अमेझॉन प्राईम व्हिडीओचे डायरेक्टर अँड हेड, कंटेंट विजय सुब्रमण्यम म्हणाले की, “मागील अनेक वर्षांपासून अबंडनतिया एंटरटेनमेंट कथाकारांचे पॉवरहाऊस बनले आहे, ताज्या दमाची आणि गुंगवून ठेवणाऱ्या कथा आमचे त्यांच्या सोबतचे नाते आणखी दृढ करतात. शकुंतला देवी यांची यशोगाथा प्रस्तुत केल्यानंतर आम्ही शेरनीकरिता उत्साही आहोत. भारत आणि जगभरातील ग्राहकांसाठी पुन्हा एकदा विद्या बालन अभिनीत सिनेमा घेऊन आम्ही येत आहोत. हा सिनेमा विलक्षण विजयश्रीची कहाणी सांगतो. ती केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणार नाही, तर त्यांना आरामात घरी बसून साहसी अनुभव देऊ करेल.”

या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन असून शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी या अष्टपैलू कलाकारांचा समावेश आहे.