
How's The Josh या एका वाक्याने अनेकांची मनं जिंकणारा सुप्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) आज त्याच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक मोठी घोषणा केली आहे. विकीने आपल्या सोशल अकाउंटवरुन त्याचा आगामी चित्रपट 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' (The Immortal Ashwatthama) चे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून यात विकी कौशल कसा दिसणार हे पाहण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या पोस्टरमध्ये मॉडर्न वर्ल्डची झलक पाहायला मिळत आहे. ज्यात एक वेगळीच दुनिया दिसत आहे.
या पोस्टरमध्ये शिवाची एक मोठ्या प्रतिमेसमोर हातात तलवार घेऊन अश्वत्थामा दिसत आहेत. या पोस्टरमध्ये त्यांच्या तलवारीतून निघणारी वीज ही जणू आकाशात लखाखत आहे असे दिसत आहे. तर दुस-या पोस्टरमध्ये अश्वत्थामा कोणत्यातरी रोबोटच्या हातांवर बसून आकाशातून कडाडणारी वीज धरून ठेवत असताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Tiger Shroff Casanova Trailer: कैसनोवा बनलेल्या टायगर श्रॉफ चा नवीन गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित, Watch Video
View this post on Instagram
विक्की कौशलचे हे दोन्ही पोस्टर खूपच वेगळे आणि हटके आहेत. या चित्रपटासाठी विकीला आपले वजन कमी करावे आणि वाढवावे लागणार आहे. द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा हे अमर होते.
View this post on Instagram
या पोस्टर आज उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रिलीज करण्यात आले. हा चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित करणार आहेत. त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट सुद्धा लिहिली आहे. या चित्रपटातील VFX चे काम अमेरिकेत केले जाईल.