![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/06/vicky-kaushal-and-katrina-kaif-380x214.jpg)
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडियावर अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचा ‘रोका’ झाला असल्याचीही बातमी आली होती. मात्र त्यावेळी विकी कौशलने हे वृत्त फेटाळून लावले होते. आता हे जोडपे येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे. काही अहवालांमध्ये तर सब्यसाची यांच्या लग्नाचा खास पोशाख शिवणार असून त्याचे कापड सिलेक्शन चालू असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. आता या सर्व अफवांवर कतरिना कैफने आपले मौन सोडले आहे.
एक दिवस आधी, संध्याकाळी कतरिना आणि विकी दोघेही सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीच्या ऑफिसबाहेर दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या. आता कतरिना कैफने लग्नाच्या या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'बॉलीवूड लाईफ'च्या रिपोर्टनुसार, कतरिनाने विकीसोबतच्या लग्नाच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जेव्हा कतरिनाला तिच्या विकीसोबतच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, हा प्रश्न तिला गेल्या 15 वर्षांपासून विचारला जात आहे.
कतरिनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्या खऱ्या नाहीत व आपण इतक्यात लग्न करणार नाही. दरम्यान, याआधी विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघे अंबानींच्या होळी पार्टीत एकत्र एन्जॉय करताना दिसले होते, त्यानंतर यांच्यातील अफेअरच्या बातमीला पहिल्यांदा हवा मिळाली. कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही, परंतु दोघांनी ही गोष्ट कधी नाकारलीही नाही. अलीकडेच हर्षवर्धनने स्पष्ट केले की कतरिना आणि विकी एकमेकांना डेट करत आहेत. (हेही वाचा: Tadap Trailer Relese: बॉलीवूड अभिनेता 'सुनील शेट्टीचा' मुलगा 'अहान शेट्टीचे' बॉलीवूडमध्ये पदार्पण)
दुसरीकडे अहवालानुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ कोविडच्या आधी एका मोठ्या प्रकल्पासाठी एकत्र येणार होते, पण साथीच्या रोगामुळे त्याला विलंब झाला. आता कदाचित याच प्रकल्पासाठी दोघे एकत्र येत आहेत व त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत असल्याचे बोलले जात आहे. याच प्रकल्पाबाबत चर्चेसाठी दोघेही रेश्मा शेट्टीच्या कार्यालयात पोहोचले होते. आता विकी आणि कॅट चित्रपटासाठी एकत्र येतात का जाहिरातीसाठी ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.