जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात भर्ती
Dilip Kumar | (Photo Credit : Twitter)

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. तर दिलीप कुमा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी मे महिन्यात सुद्धा दिलीप कुमार यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा काही चाचण्या केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला गेला होता.

दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, त्यांना नॉन-कोविड हिंदुजा, खार येथे रुटीन टेस्ट आणि तपासााठी दाखल केले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तर डॉ. नितीन गोखले यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रार्थना त्यांच्यासोबत असू द्या.(Smyrna Plane Crash: टार्जन अभिनेता Joe Lara यांचे विमान अपघातात निधन, पत्नी Gwen Lara यांच्यासह इतर पाचजणांचाही मृत्यू)

Tweet:

दरम्यान, डिसेंबर 2020 पासूनच दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली आहे. याबद्दलची माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी स्वत: दिली होती. यापूर्वी सुद्धा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर सायरा बानो दिलीप कुमार यांची सर्वप्रकारने नेहमीच काळजी घेताना दिसून येतात.