Deb Mukherjee Passes Away (फोटो सौजन्य - फेसबुक)

Deb Mukherjee Passes Away: काजोल आणि राणी मुखर्जी यांचे काका आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील, ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी (Deb Mukherjee) यांचे निधन झाले आहे. देब मुखर्जी यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. होळीच्या सणाच्या दरम्यान आलेल्या या बातमीने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी सकाळी वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांचे निधन झाल्याची पुष्टी केली. देब मुखर्जी हे आशुतोष गोवारीकर यांचे सासरे देखील होते.

देब मुखर्जी यांचे अंतिम संस्कार

देब मुखर्जी यांचे अंतिम संस्कार 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता जुहू येथील पवन हंस स्मशानभूमीत होतील. काजोल, अजय देवगण, राणी मुखर्जी, तनुजा, तनिषा, आदित्य चोप्रा, आशुतोष गोवारीकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. देब मुखर्जी यांच्या अत्यंविधीला बॉलिवूडमधील इतर अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहू शकतात. (हेही वाचा -Bhagyashree Hospitalised: बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री रुग्णालयात दाखल, 13 टाके पडल्यानंतर प्रकृती बिघडली; फोटो पाहून चाहत्यांनी व्यक्ती केली चिंता)

देब मुखर्जी यांनी 60 च्या दशकात 'तू ही मेरी जिंदगी' आणि 'अभिनेत्री' सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी अभिनय सुरू ठेवला आणि 'दो आँखे' आणि 'बातो बातों में' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या कारकिर्दीत नंतर त्यांनी 'जो जीता वही सिकंदर' आणि 'किंग अंकल' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. 2009 मध्ये विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' या चित्रपटात ते छोट्या भूमिकेत दिसले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

निर्माता शशधर मुखर्जी हे काजोलचे आजोबा होते आणि त्यांचा मोठा मुलगा शोमू मुखर्जी (काजोलचे वडील) होते. देव मुखर्जी, जॉय मुखर्जी, रोनो मुखर्जी आणि सुब्बीर मुखर्जी हे अभिनेत्री काजोलचे काका आहेत. 1941 मध्ये कानपूर येथे जन्मलेले देब मुखर्जी एका प्रतिष्ठित आणि यशस्वी चित्रपट कुटुंबातील होते. त्यांची आई सतीदेवी ही अशोक कुमार, अनूप कुमार आणि किशोर कुमार यांची एकुलती एक बहीण होती.

काजोल आणि राणी मुखर्जी या देब मुखर्जी यांच्या भाच्या आहेत. देब मुखर्जी यांचे दोनदा लग्न झाले होते. त्यांच्या पहिल्या लग्नातील मुलगी सुनीता हिचे लग्न दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी झाले आहे. तथापि, अयान हा त्याचा दुसऱ्या लग्नापासून झालेला मुलगा आहे.