बॉलिवूड सिनेनिर्माते, Venus Records & Tapes चे मालक  चंपक जैन यांचे  निधन
Champak Jain | Photo Credits: Twitter

Venus Records & Tapes,यूनाइटेड 7 चे मालक आणि प्रख्यात बॉलिवूड सिनेनिर्माते चंपक जैन (Champak Jain) यांचे आज (31 ऑक्टोबर) निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जैन यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाला आहे. उद्या (1 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यविधी केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या 'मै खिलाडी तू अनाडी','जोश','बाजिगर' सिनेमाची त्यांनी निर्मिती केली होती. चंपक जैन यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवुड सह सिने चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोनू सूद, संजय निरूपम यांनी खास ट्विटच्या माध्यमातून चंपक जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सोनू सूद ट्विट

संजय निरूपम ट्वीट

मिका सिंग ट्वीट

चंपक जैन यांना सहा भाऊ आहेत. रमेश जैन, रतन जैन, गणेश जैन, गिरीश जैन उमेद जैन, भंवर जैन यापैकी चंपक जैन हे सहावे भाऊ होते. सारे जैन कुटुंबीय घरातील विविध कंपन्यांमध्ये काम करत आहेत. तर चंपक जैन हे कंपनीचा व्यवहार सांभाळण्यासोबतच बॉलिवूड सिनेमाच्या निर्मिती क्षेत्रामध्येही काम करत होते.