Video: डान्स करताना अभिनेत्री उर्वशी रौतेला पडली स्विमिंग पूलमध्ये, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Urvashi Rautela (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील सर्वात हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. तसेच बोल्ड आणि सेक्सी फोटोंच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांवर छाप पाडत असते. तर सध्या सोशल मीडिवार उर्वशी हिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती स्विमिंग पूलच्या ठिकाणी डान्स करताना दिसून येत आहे.

उर्वशी हिने नुकताच एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती रविवार मजेत घालवत असल्याचे म्हटले आहे. परंतु स्विमिंग पूल शेजारी ती दिसून आली असून डान्स करताना ती अचानक स्विमिंग पूलमध्ये पडली असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. यावर उर्वशी हिने पोस्टसाठी काहींना वाटेल हे प्री-प्लॅन होते असे कॅप्शन दिले आहे.(Sunny Leone Condom Ad: सनी लिओनी हिच्या बोल्ड मॅनफोर्स कंडोम जाहिरात व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ (Viral Video)

 

View this post on Instagram

 

Haters will say its pre planned 😘✋🏻 however i was really enjoying myself & sunday. (Tag that evil friend )❌❌

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor (@urvashirautela) on

परंतु काही जणांनी तिला ट्रोल केले आहे. तर काही चाहत्यांना उर्वशी हिचा हा प्रकार फेक असल्याचे म्हटले आहे. मात्र उर्वशीने रविवार आनंद घालवला असल्याचे सांगितले आहे.