....आणि शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड झाला !
शेरा सलमान खानसोबत. (Photo Credit : Instagram)

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान जितका लोकप्रिय आहे तितकाच त्याचा बॉडीगार्ड शेराही प्रसिद्ध आहे. गेल्या 20 वर्षांपासून शेरा सलमान खानसोबत सावलीसारखा आहे. गुरमीत सिंग जॉली म्हणजेच शेरा हा सलमानच्या स्टाफपैकी एक असला तरी आता त्याच्या कुटुंबातील एक सदस्यच झाला आहे.

# एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षितता पुरवल्याबद्दल शेराला जवळपास 2 कोटी मानधन दिले जाते. म्हणजेच त्याला महिन्याला १६ लाख रुपये मिळतात.

# सलमान खानला ज्या ठिकाणी जायचे असते त्या ठिकाणी शेरा एक दिवस आधी जावून पाहाणी करतो. अनेकदा त्याला रस्ता क्लिअर करण्यासाठी खूप चालावे लागते. एकदा शेरा रस्ता क्लिअर करण्यासाठी कारमधून उतरुन ८ किलोमीटर पायी चालला होता.

# बॉडी बिल्डींगची आवड शेराला लहानपणापासूनच आहे. १९८७ साली ज्यूनिअर मिस्टर मुंबई आणि १९८८ मध्ये ज्यूनिअर वर्गात मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवड झाली होती.

# शेराचा जन्म शिख कुटुंबात झाला. त्याच्या वडीलांचे मुंबईमध्ये गाडी रिपेअर करण्याचे वर्कशॉप होते. परंतु, एकुलत्या एक शेराने करिअर म्हणून एका हटके क्षेत्राची निवड केली.

# त्यानंतर एका मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार शेराने सिनेसृष्टीतील कलाकारांना आणि व्यावसायिकांना सुरक्षा उपलब्ध करुन देण्याच्या कामाला सुरुवात केली.

# सुरुवातीला शेरा बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हॉलिवूड कलाकारांनाही भारतात आल्यानंतर सुरक्षा पूरवत असे.

# पण शेराच्या करिअरला गती मिळाली ती 1995 साली. त्यावर्षी सोहेल खानने शेराकडे सलमानच्या परदेशी दौऱ्यासाठी सुरक्षा मागितली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

# शेराच्या कामामुळे सलमान भलताच प्रभावित झाला आणि त्याने आपला बॉडीगार्ड म्हणून त्याची नेमणूक केली.

# सलमानला चाहत्यांच्या गर्दीतून बाहेर काढताना डोक्यावरील पगडीचा अडथळा शेराला जाणवू लागला आणि कर्तव्य बजावण्यासाठी त्याने केस कापले, पगडी उतरवली.

# पूर्वी शेरा मुंबईमध्ये सलमानच्या शेजारी राहायचा. त्यानंतर तो त्याचा बॉडीगार्ड झाला.

# सलमानच्या प्रोत्साहनामुळे शेराने मुंबईत विजक्रॉफ्ट इव्हेंट कंपनी सुरु केली. त्याचबरोबर त्याची 'टायगर सिक्युरिटी' कंपनीही आहे, जी स्टार्संना सुरक्षा पुरवते. भारतात येणाऱ्या हॉलिवूड स्टार्संनाही शेरा सुरक्षा पुरवतो.

# शेरा सलमानला भाई म्हणतो.