आज, शुक्रवारपासून भारतातील सर्वात मोठा संगीत महाकुंभ 'उदयपूर जागतिक संगीत महोत्सव 2020' (Udaipur World Music Festival) उदयपुर इथे सुरु होणार आहे. 3 दिवस चालणार्या या महोत्सवात स्पेन, फ्रान्स, स्वित्झर्लंड, कुर्दिस्तान, इराण/लेबनॉन, पोर्तुगाल आणि भारत यासह, जगातील 20 देशांतील 150 हून अधिक संगीतकार सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी अंबरई घाट, फतेहसागर पाल आणि गांधी मैदान ही ठिकाणे हवामान आणि मूड या गोष्टींचा विचार करून निवडली गेली आहेत.
भारताचे प्रसिद्ध कलाकार आणि डिझाइनर सुमंत जयकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली, जागतिक संगीत महोत्सवाच्या सर्व ठिकाणी भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे. उदयपूरचा ऐतिहासिक वारसा या स्टेजवर दाखवण्यात आला आहे. शहराच्या गांधी मैदानावर बांधलेल्या उत्सवांच्या भव्य स्टेजवर उदयपूरला उगवत्या सूर्याचा आणि शौर्याचा प्रदेश म्हणून दर्शवले आहे. या महोत्सवात भारतामधील गिन्नी माही, सुधा रघुरामन, ह्वेन चाय मिट टोस्ट, मामे खान, थाइकुदम ब्रिज, रवि जोशी, अंकुर तिवारी आणि घलत परिवारसोबत, मालीचे हबीब कोयटे, फ्रांसचे नो जैज सोबत स्पेन आणि स्वित्झर्लंडमधील अनेक नामवंतांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
यावर्षी उदयपूर जागतिक संगीत महोत्सवात '‘वी आर द वर्ल्ड: यूनिटी इन डायव्हर्सिटी’, ही संकल्पना साजरी केली जाणार आहे. नियोजित क्युरेशन, ऑन ग्राउंड इव्हेंट्स आणि कलाकारांशी सुसंवाद साधत साजरा होणारा हा संगीत महोत्सव, चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सोशल मिडीयावर पोस्टर व्हायरल (Video))
वर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता, गांधी ग्राऊंड येथे होणार आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी थीमवरील सुधा रघुरामन आणि जेफ्री मेपोंडो यांचे पहिले सादरीकरण होईल. हे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांना श्रद्धांजली असणार आहे. त्यानंतर पंजाबी फोक, रेप ऑर हिप-हॉप सिंगर गिन्नी माही आपली कला सादर करतील. त्यानंतर स्वित्झर्लंडच्या शेनलेरटेलरर व त्यानंतर इंडियन निओ फोक यांचे सादरीकरण होईल. शेवटी, फ्रान्सचा इलेक्ट्रिक जाझ 'नो-जाझ' प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.