कोरोना व्हायरसवर (Coronavirus) मात करण्यासाठी आज संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू (Janata Curfew) पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी जनतेला घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत (Superstar Rajinikanth's) यांनीदेखील आपल्या ट्विटर हँडलवरून लोकांना घरी राहण्याचा आणि मोदींनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. यासाठी रजनिकांत यांनी ट्विटरवर जनता कर्फ्यू संदर्भातील व्हिडिओ शेअर केला होता. परंतु, त्यांचा हा व्हिडिओ ट्विटरने डिलिट केला आहे.
रजनिकांत यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी देशवासियांना ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यात त्यांनी 22 मार्च म्हणजेच रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत लोकांनी स्वतःला घरात कैद करत जनता कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन केलं होतं. जनतेने जनता कर्फ्यूला साथ न दिल्यास आपल्या देशातही इटलीसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे घरात थांबून आपण करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखू शकतो, असं म्हटलं होतं. परंतु, त्यांचा हा व्हिडिओ ट्विटरने डिलिट केला आहे. (हेही वाचा - कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या नखऱ्यांनी रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ वैतागला)
दरम्यान, ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनिकांत यांनी या व्हिडीओमध्ये काही चुकीचे संदर्भ दिले होते. त्यामुळे ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन झालं होतं. जनतेमध्ये चुकीची माहिती पसरू नये, यासाठी ट्विटरने रजनिकांत यांचान हा व्हिडीओ डिलिट केला आहे.