Mumbai Saga Trailer: जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी च्या 'मुंबई सागा' अॅक्शन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ
Mumbai Saga Trailer (Photo Credits: Youtube)

Mumbai Saga Trailer: दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या मल्टीस्टारर फिल्म 'मुंबई सागा' चा धमाकेदार ट्रेलर आज इंटरनेटवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी, जॉन अब्राहम, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल, रोहित रॉय, अंजना सुखानी, प्रतीक बब्बर आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यासह इतर अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा हा ट्रेलर अ‍ॅक्शन, जबरदस्त डायलॉग्स आणि फाइट सीन्सने भरलेला आहे.

दरम्यान, ट्विटरवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना इमरान हाश्मीने लिहिलं आहे, "माझा गोळी पासून वाचवण्यासाठी अमर्त्य राव यांना पुन्हा पुन्हा भाग्यवान व्हावे लागेल. आणि माझ्याकडे फक्त एक वेळ आहे. सादर आहे यावर्षीच्या सागाचा ट्रेलर." या चित्रपटात इमरान हाश्मी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. (वाचा - Sita-The Incarnation: 'सीता'ची कथा मोठ्या पडद्यावर येणार; 'बाहुबली' चित्रपटासोबत 'हे' आहे कनेक्शन)

या ट्रेलरची सुरूवात संतप्त अमर्त्य राव (जॉन अब्राहम) ने केली आहे आणि ज्यात तो कोणीही हप्ता देणार नसल्याचं म्हणत आहे. यासोबतचं मुंबईच्या रस्त्यावरील फाइट सीन्स आश्चर्यचकित करणारे आहेत. चित्रपटाची कथा प्रामुख्याने जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीभोवती फिरत आहे. यात सुनील शेट्टी आणि समीर सोनी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

चित्रपटाची कथा 1980 आणि 1990 च्या दशकातील दाखवण्यात आली आहे. संजय गुप्ता यांनी यापूर्वी काबिल, शूटआउट एट वडाला आणि कांटे यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून आता ते 'मुंबई सागा' प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.