
Jaat Trailer Out: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) च्या बहुप्रतिक्षित 'जाट' चित्रपटाचा ट्रेलर (Jaat Trailer) प्रदर्शित झाला असून आता चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये रणदीप हुडा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी 'जाट'चा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. मैत्री मूव्हीच्या बॅनरखाली बनवलेल्या 'जाट' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला सनी देओल, रणदीप हुडा आणि चित्रपटातील संपूर्ण कलाकार उपस्थित होते. गदर 2 द्वारे सनी देओलने हे सिद्ध केले की चाहत्यांमध्ये त्याची लोकप्रियता काळानुसार सतत वाढत आहे.
सनी देओलची दमदार अॅक्शन भूमिका -
'जाट' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सनी देओल नेहमीप्रमाणे दमदार अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटातील खलनायकाचे नाव रणतुंगा आहे, ज्याची भूमिका लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा साकारत आहे. यावेळी त्याचे पात्र थोडे धोकादायक आहे आणि संपूर्ण गाव त्याला घाबरत असल्याचं दिसत आहे. संपूर्ण गावात त्याची भीती आहे. रणदीपने खलनायकाच्या भूमिकेत छाप पाडली असून दमदार संवाद चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवत आहेत. (हेही वाचा -Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट; Rhea Chakraborty ला मिळाली क्लीन चिट, जाणून घ्या पुढे काय)
जाट चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ -
जाट चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख
सनी देओल आणि रणदीप हुडा एकत्र येऊन सिनेमाप्रेमींना वेड लावण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. 'जाट' हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. सध्या सगळेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.