Article 370 Trailer: आर्टिकल 370 चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाल्यापासून 'हे' लुक चर्चेत, नेमकं काय कारण?
Article 370 Trailer

Article 370 Trailer: यामी गौतमी हीचा बहुचर्चित आर्टिकल 370 चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला. हा चित्रपट लवकरच रुपरे  पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटात अनेक अॅक्शन सीन आणि ड्रामा आहे. या चित्रपटात यामी ही काश्मीरमध्ये दहशतवादाशी लढताना दिसणार आहे त्याच सोबत प्रिया मणी देखील झळकणार आहे. कलम 370 हटवण्यावरून झालेल्या परिस्थितीचे वर्णन करणारा घटनेवर आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर काह महत्त्वाच्या भुमिका या चर्चेत आल्या आहेत. ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे, पुलवामाची घटना दाखवली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्रा यांनी देशाला संबोधित केलं होते ती घटना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटातील दाखवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका अभिनेते अरुण गोविल यांनी हाताळली आहे. सोशल मीडियावर अरुण गोविल यांच्या लुकची चर्चा होताना दिसत आहे. अरुण गोविल हे ८० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय असलेली मालिकी रामायाण. यात त्यांनी रामाची भुमिका साकारली होती. त्यानंतर ते आता आर्टिकल ३७० या चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याशिवाय देशातील गृहमंत्री यांची देखील भुमिका सांभळणारे किरण करमरकर यांचा लुक देखील चर्चेत आले आहे. यांचा लुक पाहून नेटकरी आवाक झाले आहे.( हेही वाचा-आर्टीकल 370 चा ट्रेलर आऊट, यामी गौतमी देणार दहशतवाद्यांशी लढा)

हा चित्रपट २३ फेब्रुवारीला सिनेमागृहात पाहता येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुहास जांभळे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची निर्मितीचे काम आदित्या धर, लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी सांभळली आहे. अरुण गोविल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लुकमध्ये ओळखणे कठीणचं झाले आहे. अरुण गोविल यांच्या चाहत्यांना अत्यंत आनंद झाला आहे.