कोर्टात खेचण्याचा इशारा दिल्यामुळे संगीतकार विशाल दादलानी झाला ट्रोल
Vishal Dadlani (Photo Credits: Twitter)

जुन्या गाण्यांचे रिमिक्स बनवणे आजकालचा ट्रेंड आहे. संगीत विश्वात गाणे हिट होण्यासाठी त्याला रिमिक्सची जोड दिली जाते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र संगीतकार विशाल दादलानी याबाबत तितकासा खुश नसल्याचे दिसत आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर याबाबत इशारा दिला. विशाल म्हणतो, जर कोणी त्याच्या गाण्याचे रिमिक्स केले तर त्या व्यक्तीवर तो गुन्हा दाखल करेल. आता विशालची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. कारण जनतेने विचालला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. याआधी विशाल-शेखर जोडीनेही अनेक रिमिक्स बनवले आहेत त्यामुळे विशालची ही पोस्ट थट्टेचा विषय बनली आहे.

आपल्या पोस्ट मध्ये विशालने लिहिले आहे - चेतावणीः विशाल आणि शेखर यांच्या गाण्यांचे रिमिक्स बनवणाऱ्या प्रत्येकावर मी केस दाखल करेन, तसेच चित्रपट आणि संगीतकारांविरूद्ध न्यायालयातही धाव घेईन.

साकी साकी नंतर, मी आगामी दस बहाने, दीदार दे, सजनाजी वारी वारी, देसी गर्ल आणि अशा अनेक गाण्याचे रिमिक्स बनत असल्याचे ऐकत आहे. तरी स्वतःची गाणी बनवा.

विशालने लिहिले हा प्रत्येक शब्द योग्य आहे, आम्हालाही तेच हवे आहे. मात्र याआधी विशाल-शेखर जोडीनेही अनेक रिमिक्स बनवले आहेत त्याबाबत शेखर आता ट्रोल होत आहे. इतरांना रिमिक्स बनवू नका असे सांगणारे त्याबाबत आधीच दोषी आहेत.

 

तर अशाप्रकारे रिमिक्स बाबत ट्विट करून स्वतःच्या फसलेल्या विशालला एक सल्ला- पुढच्यावेळेस थोडासा अभ्यास कर आणि मग सोशल मिडीयावर आपले विचार मांड.