The Kashmir Files Controversy: कश्मिर फाईल्स हा प्रपोगांडा आणि वल्गर सिनेमा, ज्युरीच्या 'या' मतांवर अभिनेता अनुपम खेर आणि सहकलाकार दर्शन कुमारची पहिली प्रतिक्रीया

इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचे (International Film Festival) ज्यूरी प्रमुख आणि इस्त्राईल चित्रपट निर्माते  नदाव लॅपिड ( Israeli filmmaker Nadav Lapid) यांनी बहुचर्चित सिनेमा कश्मिर फाइल्सला (The Kashmir Files) प्रपोगांडा (Propaganda) आणि वल्गर सिनेमा म्हण्टलेलं आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल सारख्या नामांकीत सिनेमाच्या यादित यांसारख्या सिनेमाचं नामांकन होणं अयोग्य असल्याची प्रतिक्रीया नदाव लॅपिड यांनी दिली आहे. गोव्यात (Goa) नुकत्याचं पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलच्या कार्यक्रमाच्या समारोप समारंभात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यासह सरकारच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत नदाव लॅपिड यांनी हे वक्तव्य केलं आहे. तरी लॅपिड यांच्या या वक्तव्याचे संपूर्ण देशात पडसाद उमटताना दिसत आहेत. सर्वसामान्यांसह चित्रपट सृष्टीतून देखील नदाव यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रीया येत आहेत. ज्युरीच्या या मतावर कश्मिर फाइल्स अभिनेता अनुपम खेर  आणि सहकलाकार दर्शन कुमार यांनी प्रतिक्रीय दिली आहे.

 

ज्यूरी मेंमबर नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना अनुपम खेर (Actor Anupam Kher) म्हणाले, जर होलोकॉस्ट योग्य आहे तर काश्मिरी पंडितांचे (Kashmiri Pandit) निर्गमन देखील योग्यचं आहे. पण लॅपिड यांच्या त्या वक्तव्यानंतर सोशल मिडीयावर (Social Media) जी टुलकीट (Toolkit Gang) टोळी सक्रीय झाली आहे त्यामुळे नदाव यांचं हे वक्तव्य पूर्वनियोजित असल्याचं भासत आहे. देव लॅपिड यांना सदबुध्दी देवो, केवळ आपला अजेंडा साकराण्यासाठी या प्रकारच्या प्रतिक्रीया असल्या मोठ्या मंचावरुन देवू नये अशी खोचक प्रतिक्रीया अनुपम खेर यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Kiara and Sidharth Wedding Date: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर केली मोठा घोषणा, Watch Video)

 

तोच काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) सिनेमात महत्वाचा रोल निभवलेला अभिनेता दर्शन कुमार (Nadav Lapid)  याने देखील नादाव लॅपिडच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर टिपण्णी केली आहे. दर्शन म्हणतात, प्रत्येकाला त्याचं स्वतंत्र्य मत आहे. पण कश्मिर फाइल्स या सिनेमाने कश्मिरी पंडीतांची आपबीत दिखवल्याचं सत्य कुणीही नाकारु शकत नाही. मनोरंजन जगाबाहेरुन देखील नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रीया येत आहेत.