Tunisha Sharma Suicide Case: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) च्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा माजी प्रियकर आणि सहअभिनेता शीझान खान (Sheezan Khan) न्यायालयीन कोठडीत आहे. शीजान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. या प्रकरणात शीझानला दिलासा मिळू शकलेला नाही. शीझानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी सोमवारी म्हणजेच 9 जानेवारीला होणार आहे.
शीझानच्या वकिलाने सांगितले की, शीझान निर्दोष असून त्याचे कुटुंबीय आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे त्याला त्रास होत आहे. तुनिषाने 24 डिसेंबरला तिच्या शोच्या सेटवर आत्महत्या केली. या प्रकरणी अभिनेत्रीच्या आईने शीझान खानविरोधात आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. शीझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. (हेही वाचा - Tunisha Sharma Death Case: तुनिषा शर्मा-शिजान खान दोघही त्यांच्या आयुष्यात मुव्ह ऑन झाले होते पण.. व्हॉट्सअप चॅटमधून मोठा खुलासा)
शीझानचे वकील पुढे म्हणाले, "सत्य आणि न्यायाचा विजय होईल, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी पुन्हा सांगतो की शीझान मोहम्मद खान निर्दोष आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास होत आहे."
ताज्या वृत्तानुसार, पोलिसांनी शीझान आणि त्याची 'गुप्त मैत्रीण' यांच्या चॅट्सही परत मिळवल्या आहेत. यासोबतच शीझान इतर अनेक मुलींशीही बोलायचा, अशी माहिती समोर आली आहे. एएनआयच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 'तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलवर अनेक महत्त्वाच्या चॅट्स आढळून आल्या आहेत, ज्यामध्ये हे उघड झाले आहे की ब्रेकअपनंतर आरोपीने तुनिशापासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. तुनिशा त्याला वारंवार मेसेज करत होती. मात्र आरोपी तुनिशाकडे दुर्लक्ष करत होता.
मागील सुनावणीदरम्यान शीझानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 2 जानेवारीला शीझान कुटुंबीयांनी एक पत्रकार परिषद बोलावली ज्यात त्यांनी शीझानच्या 'सिक्रेट गर्लफ्रेंड'च्या बातम्यांचे खंडन केले. शीझानची बहीण फालक हिनेही सोशल मीडियावर तुनिशा-शीझानच्या ब्रेकअपबाबत सविस्तर खुलासा केला होता.