Thappad Trailer Out: अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या 'थप्पड' चित्रपटातून महिलांना मारहाण करणा-या पुरुषांना देणार जोरदार चपराक; ट्रेलर प्रदर्शित
Thappad Trailer (Photo Credits: Youtube)

समाजात महिलांवर अत्याचार, मारहाण करणा-या पुरुषांना जोरदार चपराक मारणारा 'थप्पड' (Thappad) चा दमदार ट्रेलर आपल्या भेटीला आहे. तापसी पन्नू (Taapsee Pannu)  या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करत आहेत. अनुभव सिन्हा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. समाजातील बुरसटलेल्या विचारांना तापसी पन्नू ने आपल्या या चित्रपटाच्या माध्यमातून जबरदस्त उत्तर दिले आहे हे या ट्रेलरमधून दिसत आहे. अभिनेता पावेल गुलाटी (Pavail Gulati) देखील या चित्रपटात तापसीसह प्रमुख भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुन या चित्रपटाबाबतची सर्वांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.

थप्पड चित्रपटाच्या 2 मिनिट 54 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये मारण्यात आलेली चपराक समाजाच्या कायम लक्षात राहील अशी आहे. तापसी या चित्रपटात एका विवाहित स्त्रीची भूमिका साकारत आहे.

पाहा ट्रेलर:

हेदेखील वाचा- Happy Birthday Mithali Raj: तापसी पन्नू ने अशाप्रकारे साजरा केला मिताली राज चा वाढदिवस, बायोपिकची केली पुष्टी, पाहा Photo

ट्रेलरवरुन तापसी आणि तिचा नवरा हे आनंदी जोडपं दाखवलं आहे. मात्र त्यांच्या आयुष्यात एक क्षण येतो जेथे तिचा पती तिच्यावर हात उचलतो आणि चित्रपटाची कथा पूर्णपणे बदलून जाते. त्यानंतर त्या दोघांचा आयुष्यात आलेला एक वेगळा ट्विस्ट समाजात काय बदल घडवेल हे येत्या 28 फेब्रुवारीला समजेल.

तापसी पन्नू ने याआधी केलेल्या पिंक, बदला यांसारख्या चित्रपटातून समाजातील गंभीर विषयांना हात घातला आहे. त्यात तिच्या दमदार अभिनयाने ते विषयही लोकांच्या मनात खोलवर भिनविण्यास ती यशस्वी झाली आहे. आता आपल्या आगामी थप्पड चित्रपटातून आपल्या अभिनयाचा काय नवीन पैलू लोकांसमोर मांडेल हे लवकरच कळेल.