Ram Charan Tests Positive For COVID-19: कोरोना विषाणूचे (COVID-19) संकट अद्याप संपलेले नाही. आतापर्यंत अनेक कलाकार तसेच दिग्गज व्यक्ती कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. यातील अनेकांनी कोरोनावर मात केली. मात्र, काहींची कोरोना विरोधातील लढाई अयशस्वी ठरली. नुकतीचं तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण (Ram Charan) ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राम चरण यांनी स्वत: आपल्या सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती दिली आहे. यात राम चरणने म्हटलं आहे की, मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी स्वत: ला घरात क्वारंटाईन केलं आहे. तसेच राम चरणने गेल्या काही दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना आपली कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनातून आपण लवकरचं बरं होणार असल्याचा विश्वासदेखील राम चरणने व्यक्त केला आहे.
दरम्यान, एक महिन्यापूर्वी राम चरणचे वडील आणि मेगास्टार चिरंजीवी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आचार्य चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदर्शनास आलं होतं. परंतु, चिरंजीवीची नंतरची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे आढळले होते. (हेही वाचा - Sonam Kapoor Ahuja ने सुरू केली 'ब्लाइंड' चित्रपटाची शुटिंग; सोशल मीडियावर शेअर केला फोटो)
Request all that have been around me in the past couple of days to get tested.
More updates on my recovery soon. pic.twitter.com/lkZ86Z8lTF
— Ram Charan (@AlwaysRamCharan) December 29, 2020
राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आरआरआर चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगनच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. आलिया भट्टचा हा पहिला तेलगू चित्रपट असणार आहे.