Tanhaji poster, Shital Malusare (Photo Credits: Facebook)

Sheetal Malusare On Issues Raised By Sambhaji Brigade: अजय देवगण याचा ऍक्शनपट असणाऱ्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटाचा ट्रेलर 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर रिलीझ होताच काहीच वेळात चित्रपटाची भव्यता, लुक्स, इफेक्ट्स या सर्व गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. परंतु, ट्रेलरमधील काही गोष्टीवर आक्षेपही घेण्यात आला. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या संघटनेने आज चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही गोष्टींबाबत त्यांनी आक्षेप घेतला असून, त्याबाबत स्पष्टीकरण सिनेमाच्या टीमकडे मागितले आहे. हा सिनेमा दाखविल्याशिवाय प्रदर्शित केल्यास संभाजी ब्रिगेड त्यांच्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

हा सर्व वाद थांबावा म्हणून शीतल मालुसरे यांनी LatestLY मराठी सोबत मुलाखतीत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शीतल मालुसरे या तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज आहेत. त्यांनी चित्रपट कर्त्यांना अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि बारकावे सांगितले आहेत. त्या म्हणाल्या, "हा ट्रेलर म्हणजे चित्रपटाची पहिलीच झलक होती. या चित्रपटातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे आम्ही काटेकोरपणे लक्ष देणार आहोत. त्यामुळे सर्व बदल चित्रपटात करण्यात येतील. दिग्दर्शक ओम राऊत यांच्याशी मी स्वतः बोलले आहे."

तसेच शीतल यांनी स्वतः चित्रपटातील ऐतिहासिक बाबींकडे लक्ष दिले आहे. त्याचसोबत त्यांनी अजय देवगण यांच्या लुक मध्ये काय असावे हे देखील चित्रपट कर्त्यांना सांगितले आहे.

Tanhaji Movie:तानाजी नसून 'तान्हाजी' मालुसरे हेच खरं नाव सांगणाऱ्या त्यांच्या वंशज शीतल मालुसरे; पाहा ऐतिहासिक संदर्भांविषयी काय म्हणाल्या त्या...

चित्रपटात अजय देवगण हे तान्हाजी मालुसरे यांचं पात्र साकारतील तर काजोल त्यांच्या पत्नीचा म्हणजेच सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. सैफ अली खान हा उदयभानच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचसोबत शरद केळकर, देवदत्त नागे हे देखील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.