Tanhaji Box Office Collection: सहा दिवसात अजय देवगणचा 'तान्हाजी' चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील; जाणून घ्या एकूण कमाई
Ajay Devgn in Tanhaji (Photo Credits: YouTube)

अजय देवगण (Ajay Devgn) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर चित्रपट, 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'ने (Tanhaji: The Unsung Warrior) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मकर संक्रांतीच्या सणावेळी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या वेबसाइटनुसार ओम राऊत दिग्दर्शित, अजय देवगन, काजोल आणि सैफ अली खान ची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने सहाव्या दिवशी, तब्बल 107 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाच्या कमाईमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे, कारण उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

'तान्हाजी' हा चित्रपट भारतात 3880 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे, तर संपूर्ण वर्ल्डवाइड हा चित्रपट 4540 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत अजय देवगणच्या 11 चित्रपटांनी 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘गोलमाल अगेन’ ठरला. 200 कोटींच्या क्लबमधील अजय देवगणचा हा  एकमेव चित्रपट आहे. आता तान्हाजी गोलमाल अगेनचा टप्पा पार करून पुढे जातो का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(हेही वाचा: अ‍ॅसिड विकत घेण्यासाठी दीपिका पादुकोणने केले 'स्टिंग ऑपरेशन'; एका दिवसात 24 बाटल्यांची खरेदी (Video))

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर'ने ‘एक था टायगर’ आणि ‘दबंग 2’ यांना मागे टाकत बॉलिवूडमधील 20 सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तान्हाजीने पहिल्या दिवशी 15.10 कोटी, दुसर्‍या दिवशी 20.57 कोटी, तिसर्‍या दिवशी 26.26 कोटी, चौथ्या दिवशी 13.75 कोटी आणि पाचव्या दिवशी 15.28 कोटी आणि सहाव्या दिवशी 16.72 कोटींचा गल्ला जमवला आहे. अशाप्रकारे या चित्रपटाची 150 कोटी क्लबकडे वाटचाल सुरु आहे. दुसरीकडे दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटाने सहा दिवसांमध्ये फक्त 26 कोटींचीच कमाई केली आहे.