Sushmita Sen ने आपल्या हॉट अंदाजात वर्कआऊट करत साजरा केला आपला जन्मदिवस, Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण
Sushmita Sen (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) भलेही चित्रपटात जास्त दिसत नसली तरीही लोकांमध्ये तिची क्रेझ अजूनही कायम आहे. सुष्मिताही सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड असते.फिटनेसच्या बाबतीत नेहमी आग्रही असलेली सुष्मिता सोशल मिडियावर आपले वर्कआऊटचे (Workout) व्हिडिओज शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मिडियावर आपला वर्कआऊटचा एक हॉट व्हिडिओ (Hot Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमधील तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.

सुष्मिता सेन ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओखाली, 'मी गर्वाने सांगते की मी 45 वर्षाची आहे. तुम्ही सर्व मागील कित्येक वर्षांपासून माझ्या भावनात्मक शक्तिचे सर्वात मोठे स्त्रोत राहिले आहात. मला नेहमीची आठवणे करुन देते की असे जीवन मिळणे हा किती मोठा आशीर्वाद आहे. ज्याला अंत नाही.' असे लिहिले आहे.हेदेखील वाचा- Krishna Shroff Hot Photo: टायगर श्रॉफ ची बहिण कृष्णा च्या हॉट बिकिनी लूक ने सोशल मिडियावर लावली आग, चाहत्यांसह दिशा पटानी ने दिली ही प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता म्हणते, 'माझी इच्छा आहे की, तुम्हाला हे नेहमी लक्षात राहावे की तुमचे अतूट प्रेम आणि दया माझ्या जीवनाला आणखी सुंदर बनवतात आणि मला एक चांगला व्यक्ती बनवतात. याच पद्धतीने सच्चेपणा वाटत राहा. कारण या जगात अशीच माणसे हवी आहेत.'

अलीकडेच सुष्मिताने आपला 45 वा जन्मदिन साजरा केला. सुष्मिताच्या रोहमन शॉलनेसुद्धा तिच्या जन्मदिनी सोशल मिडियावर एक छान पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सुष्मिताने आपला बॉयफ्रेंड रोहमन आणि दोन दत्तक मुलींसह आपला वाढदिवस साजरा केला.