सुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ला बलात्काराची धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपुत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर अनेकांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakrobarty) हिला टार्गेट करायला सुरुवात केली होती. काहींची तर तिला बलात्काराच्या धमक्या (Rape Threat) देण्यापर्यंत मजल पोहचली होती. रियाने यातील एक मॅसेजचा स्क्रिनशॉट आपल्या इंस्टाग्राम वर शेअर करून महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून (Maharashtra Cyber Police)  मदतीची मागणी केली होती. या मॅसेज मध्ये तिला तू आत्महत्या कर नाहीतर तुझा बलात्कार होईल याची खबरदारी मी घेईन अशा शब्दात धमकावले होते. तिच्या या पोस्टची दखल घेत आता सांताक्रूझ पोलीस स्थानकात रियाला अश्लील व धमकावणारे मॅसेज पाठवणाऱ्या या दोन युजर्सवर गुन्हा दाखल केलेला असून त्यांच्यावर रीतसर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस उपायुक्तअभिषेक त्रिमुखे यांनी दिली आहे. Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नेमकी आहे कोण? सोशल मीडियावर होतेय चर्चा (See Photos)

रियाने आपल्या पोस्ट मधून शेअर केलेला मॅसेज हा मन्नू राऊत अशा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पाठवण्यात आला होता. रियाने या पोस्टला कॅप्शन लिहीत "तुम्ही मला स्वार्थी बोललात मी शांत राहिले. तुम्ही मला खूनी बोललात मी शांत राहिले. माझ्यावर वाईट कमेंट्स केल्या गेल्या तरीही मी शांत राहिले. पण आता अति होत आहे. मला बलात्काराच्या धमक्या देणाऱ्यांना स्वतःच्या वक्तव्याची गंभीरता माहीत नाही. कायद्याने हा गुन्हा आहे" असे म्हंटले होते.

ANI ट्विट

रिया चक्रवर्ती पोस्ट

दरम्यान, रिया ने अलीकडेच एका पोस्ट मधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मेन्शन करत सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नाही असे म्हंटले होते.