Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरण CBI कडे पाठविणे बिहारच्या अधिकार क्षेत्रात नाही- महाराष्ट्र सरकार वकिल
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा आणि सुशांतला न्याय मिळावा या मागणीसाठी हा तपास CBIकडे सोपविण्यात यावा अशी मागणी सर्वच स्तरांतून होत होती. त्यानंतर बिहार सरकारने यात लक्ष घातल्यानंतर हा तपास CBI कडे सोपविण्यास केंद्र सरकारने (Central Government) सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सुशांतची केस CBI कडे पाठविणे हे बिहारच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी सांगितले आहे.

यावर कायदेतज्ज्ञांचे असे मत आहे की, अधिकार क्षेत्राच्या मुद्द्यामुळे बिहार सरकारपुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी एक तर महाराष्ट्र सरकार CBI चौकशीची मागणी करु शकते वा शीर्ष कोर्ट याला निष्पक्ष चौकशीसाठी एजंसी ला देऊ शकतात. Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली, भाजप खासदार नारायण राणे यांचा दावा

ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदीने IANS ला सांगितले की, ही घटना मुंबईत घडली. यामुळे बिहार जवळ तपास करण्याचे अधिकार क्षेत्र नसल्यामुळे ते CBI कडे हे प्रकरण पाठवू शकत नाही. यासाठी एक तर महाराष्ट्र सरकार CBI कडे पाठवू शकते वा सुप्रीम कोर्ट स्वत: CBI कडे पाठवू शकते.

त्याचबरोबर असेही सांगण्यात येत आहे की, मुंबई पोलीस केवळ या प्रकरणाची चौकशी करत आहे. याबाबत कोणालाही अटक करण्यात आली नाही. सुशांतच्या वडिलांच्या वकिलांचे असे म्हणणे आहे की, मुंबई पोलिस या प्रकरणाचा चुकीच्या पद्धतीने तपास करत आहेत. त्यामुळे या तपासात बिहार पोलिसांना हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे.