14 जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने वांद्रे (Bandra) येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून मुंबई पोलिस (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांनी आज सकाळी 11 वाजता हा निर्णय सुनावला. त्यानंतर सुशांतचे कुटुंबिय आनंदात आहेत. तर त्याच्या चाहत्यांसाठी देखील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विट करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला साथ दिली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्वट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास CBI करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)
Akshay Kumar Tweet:
अक्षय कुमार याने ट्विटमध्ये लिहिले की, "सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. सत्याचा नेहमीच विजय होतो."
SC directs CBI to investigate Sushant Singh Rajput’s death. May the truth always prevail 🙏🏻 #Prayers
— Akshay Kumar (@akshaykumar) August 19, 2020
Anupam Kher Tweet:
"जय हो.. जय हो.. जय हो.." असे ट्विट अनुपम खेर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केले आहे.
जय हो.. जय हो.. जय हो.. 👍👏🙏 #CBIForSSR #justiceforSushanthSinghRajput
— Anupam Kher (@AnupamPKher) August 19, 2020
"मानवतेचा विजय झाला. प्रत्येक SSR वॉरिअर्सचे अभिनंदन. प्रथमच सामुहिक प्रयत्नांना बळकटी मिळाल्याचे मला जाणवले," अशा आशयाचे ट्विट कंगना रनौत टिमकडून करण्यात आले आहे.
Kangana Ranaut Tweet:
Humanity wins, congratulations to each one of SSR warriors, first time I felt such strong force of collective consciousness, AMAZING 👏👏👏#CBITakesOver
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 19, 2020
दरम्यान सुशांत सिंह राजपूत याची मैत्रिण, सहकलाकार अंकिता लोखंडे हिने देखील 'सत्याचा विजय होतो' असं ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. तर या निर्णयानंतर सुशांतच्या बहिणीने देवाचे आभार मानले आहेत. "तु आमच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस. ही तर फक्त सुरुवात आहे. सत्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल. सीबीआयवर पूर्ण विश्वास आहे," असं म्हणत सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.