व्हिडिओ : गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत सनी लिओनीचा नवा गृहप्रवेश !
सनी लिओनी (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने गणेश चतुर्थीनिमित्त एक शुभकार्य केलं आहे. 'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या तिच्या वेबसिरीजमुळे आणि केरळपूरग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे अलिकडेच सनी चांगलीच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावरील खास व्हिडिओमुळे सनी चर्चेत आली आहे.

सनीचे खास सेलिब्रेशन

आज गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांनी आपल्या घरी गणरायाचे उत्साहात स्वागत केले. तर सनीने हाच शुभमुहुर्त साधत पती डॅनियल वेबरसह नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. ही आनंदाची बातमी खुद्द सनीने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली.

सनी म्हणते...

सनीने एक पतीसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही पोस्ट करताना तिने लिहिले की, "मला आजच्या दिवशी नेमकं काय करायला हवं ते ठाऊक नाही. म्हणजे नियम... परंपरा... मात्र मी आणि डॅनियल मुंबईतील नव्या घरात गृहप्रवेश करुन गणपती सेलिब्रेट करत आहोत. त्याचबरोबर सनीने सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या."