Sunny Leone (Photo Credits: Instagram)

एकेकाळी पॉर्न स्टार असलेली आणि आता बॉलिवूडची हॉट (Hot) अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केलेली सनी लियोन (Sunny Leone) नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. तिचे एकाहून एक सरस फोटोशूट आणि व्हिडिओज ने तिच्या चाहत्यांनी तिला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले आहे. सनीने बॉलिवूडमध्येही बरेच आयटम साँग आणि चित्रपट केले. मात्र ती जास्त चर्चेत राहिली ती तिच्या आयटम साँग मुळे आणि फोटोमुळे. सनी लियोन सोशल मिडियावर देखील बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपले एक नवीन आणि हटके फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोमध्ये ती चक्क 'जलपरी'च्या (Mermaid) वेशात दिसत आहे. यात तिच्या मादक अदा आणि बोल्ड (Bold) अंदाज पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले. सनीने हे फोटो शेअर करतात अगदी काही मिनिटांतच तिला लाखोंच्या वर लाइक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

Love being a mermaid!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लियोन ला 'जिस्म 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटात आयटम साँग देखील केले. त्याचबरोबर तिने MTV चॅनलवरील Splitsvilla या शो चे सूत्रसंचालन देखील केले आहे.

हेही वाचा- सनी लियोनी जेव्हा कोकाकोला सिनेमाच्या टीम सोबत बिहारी शैलीत बोलते.. (Watch Video)

अलीकडेच  सनी लियोन चे  नाव 'कोकाकोला' (Kokakola) या नव्या सिनेमासाठी फायनल करण्यात आलं आहे. या सिनेमाची एक मीटिंग नुकतीच जुहूमध्ये पार पडली होती, या मीटिंग मधला सनीचा एक गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video)  झाला आहे. यामध्ये चित्रपटाच्या टीम सोबत सनी बिहारी (Bihari)  शैलीत बोलताना पाहायला मिळत आहे.