बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. सनीच्या संघर्षमय प्रवासाची कथा सनीच्या बायोपिक वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पर्दापण करण्यापूर्वी सनी जर्मन बेकरीत एक वेट्रेस म्हणून काम करत होती.
कुटुंबाची नाराजी पत्करुन सनीने पॉर्न स्टार म्हणून करीअर घडवले. त्यानंतर पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकत तिने बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. जिस्म 2 या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर सनी अनेक आयटम नंबर्स मध्ये थिरकली. बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यापूर्वी ती रियालिटी शो बिग बॉस मध्ये देखील झळकली होती. सनी लिओनी हिच्या बोल्ड मॅनफोर्स कंडोम जाहिरात व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ (Viral Video)
हॉट बोल्ड सनी लिओनीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. आज सनीच्या वाढदिवसानिमित्त सनीचे पाच ग्लॅमरस फोटोज...
'करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' या स्वतःच्या जीवनावर आधारीत वेबसिरीजवर सनी लिओनी झळकली होती. याशिवाय ती लवकरच तामिळ सिनेमा 'वीरामदेवी' नावाच्या सिनेमात झळकेल.