सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर ED च्या रडारवर; Sukesh Chandrashekhar ने केले होते टार्गेट, तपासात मोठा खुलासा
Janhvi Kapoor (Photo Credits: Instagram)

200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीच्या (ED) आरोपपत्रात आरोपी सुकेश चंद्रशेखरबाबत (Sukesh Chandrashekhar) मोठा खुलासा झाला आहे. ताज्या माहितीनुसार, सारा आली खान, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर अशा अभिनेत्रीदेखील सुकेशच्या निशाण्यावर होत्या. सुकेश चंद्रशेखरने त्यांना महागड्या भेटवस्तूही पाठवल्या होत्या. आरोपी सुकेशने जान्हवी कपूरला 19 लाख रुपयांची एक महागडी बॅग दिली होती. त्याचवेळी सारा अली खानला एक मौल्यवान घड्याळ देण्यात आले होते. अशाप्रकारे, सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर, सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांसारख्या इतर अभिनेत्रींवरही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

ईडीच्या आरोपपत्रानुसार अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सुकेशची तुरुंगात भेट घेतली होती. ईडीच्या आरोपपत्रात भूमी पेडणेकरच्या नावाचा समावेश आहे, परंतु भूमी पेडणेकरने सुकेशकडून कोणतीही भेट घेतली नाही. सुकेश चंद्रशेखरने या सर्वांशी वेगवेगळ्या नावाने संपर्क साधला होता. सुकेश चंद्रशेखरला तुरुंगात भेटण्यासाठी अनेक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जात असत, ज्यांना बीएमडब्ल्यू कारने नेले होते, असे ईडीच्या अहवालातून समोर आले आहे.

पिंकी इराणी अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सना सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून देण्यासाठी तिहार तुरुंगात घेऊन गेल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला प्रभावित करण्यासाठी गृहमंत्र्यांचे नाव (स्पूफिंग कॉलद्वारे) वापरले होते. सुकेशने पिंकी इराणीचा वापर करून जॅकलीन फर्नांडिसशी जवळीक साधली आणि त्या बदल्यात पिंकी इराणीला मोठी रक्कम दिली गेली होती. जॅकलीन फर्नांडिसचा मेकअप आर्टिस्टची (शान मुथातील) मदत घेऊन पिंकीने तिला सुकेशच्या संपर्कात राहण्यासाठी तयार केले. (हेही वाचा: Gangubai Controversy: 'गंगूबाई काठियावाडी'च्या निर्मात्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, चित्रपटाविरोधात दाखल केलेल्या दोन याचिका फेटाळल्या

जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची नावे मनी लाँड्रिंग प्रकरणात आली होती. सुकेश चंद्रशेखरने 2015 पासून अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सवर 20 कोटी रुपये खर्च केले आहेत. सुकेश हवालाद्वारे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे पाठवत असे.