Suhana Khan (Photo Credits: Instagram)

शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. तसं तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण वगैरे केले नाही. मात्र तिचे फोटोज आणि व्हिडिओजमुळे तिने सोशल मिडियावर स्वत:चा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे या सर्व चाहत्यांची ती लवकरात लवकर मोठ्या पडद्यावर झळकावी अशी अपेक्षा आहे. तसं शाहरुख खान कडून यासाठी हिरवा झेंडा मिळाला असून आपला अॅक्टिंग कोर्स पूर्ण झाल्यानंतर ती याबाबत नक्की विचार करेल. परदेशात अॅक्टिंगचे धडे घेत असलेली सुहाना एका शॉर्ट फिल्मध्ये काम केले आहे. नकताच तिने सोशल मिडियावर तिचा रडतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सुहानाने इन्स्टाग्रामवर तिचा हा रडतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली 'अभिनंदन, जर तुम्ही मला रडताना पाहिले नसेल. - क्वारंटाईन फिल्मिंग असे लिहिले आहे.

हेदेखील वाचा- सुहाना खान हिचा 20 व्या वाढदिवसानिमित्त ग्लॅमरस Slo-Mo Video; तुम्ही पाहिलात का?

 

View this post on Instagram

 

Congrats if u haven't seen me crying ~ quarantine filming ✌🏼😙🤪✨

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

हा फोटो पाहता हे नक्कीच तिच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भातील आहे असे दिसतय. या फोटोवर अनन्या पांडे, तिच्या आईनेही कमेंट केले आहे.

सुहाना युके मधील आर्डिंगली कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून सध्या मुंबईत आपल्या आई-वडीलांसह राहत आहे. लॉकडाऊनमध्ये ती ऑनलाईन बेली डान्स शिकत असून तिच्या नृत्य कौशल्यात भर पडल्याची माहिती काही दिवासांपूर्वीच तिच्या डान्स टीचर संजना मुथ्रेजा (Sanjana Muthreja) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती.