Star Screen Awards 2018 : रणवीर सिंग ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, दीपिका झाली भावूक
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण (फोटो सौजन्य- Instagram)

मुंबईमध्ये रविवारी स्टार स्क्रिन अवॉर्डस् 2018 (Star Screen Awards 2018) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी आपली उपस्थिती लावली होती. तर नव विवाहित जोडप रणवीर आणि दीपिका हे दोघे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यावेळी रणवीर आणि दीपिकाने काळ्या रंगाचे वस्रांमध्ये फारच सुंदर दिसून येत होते. तर अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)ला या सोहळ्यामध्ये 'पद्मावत' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर रणवीर ने जे वक्तव्य केले त्यावर तेथे उपस्थित असलेली दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि इतर मंडळी भावूक झालेली पाहायला दिसली.

रणवीरने असे म्हटले की, ''चित्रपटांमध्ये मला राणी भेटली नाही परंतु खऱ्या आयुष्यात मला क्विन भेटली आहे. प्रिये मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. I Love You'' तसेच दिग्दर्शक संजय लीला भंसाली आणि घरातील मंडळींचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. तर रणवीरला मिळालेला हा पुरस्कार त्याने त्याच्या मृत बहिणाला समर्पित केला आहे.

तसेच 'पद्मावत' या चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) याने ही मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटावरुन वादसुद्धा झाले होते. शेवटी 25 जानेवारी रोजी पद्मावत प्रदर्शित करण्यात आला होता.