सध्याच्या कठीण काळात परीक्षा घेणे Unfair; Sonu Sood ने व्हिडिओ शेअर करत मांडली भूमिका (Watch Video)
Sonu Sood | (Photo Credits: Twitter)

सध्या राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता संसर्ग आणि त्यामुळे ओढावलेले निर्बंध, लॉकडाऊन यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. यातच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा येऊ घातल्या आहेत. यावर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने आपली भूमिका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे चिंता वाटत असून यातून काहीतरी उपाय काढणे गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे. (Sonu Sood च्या नावाने फसवणूक करणाऱ्याला अटक; अभिनेत्याने फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सतर्कतेचा इशारा)

सोनू सूद म्हणाला, "सध्याच्या परिस्थितीत आपल्या देशाची संस्था आणि विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. सौदीमध्ये 600, मेक्सिकोमध्ये 1300 आणि कुवेतमध्ये 1500 रुग्ण असताना परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आपल्या देशात तर 1 लाख 45 हजार कोरोना रुग्ण आहेत. तरी देखील आपण परीक्षा घेण्याच्या विचार करत आहोत. ते अगदी अयोग्य आहे. यातून काहीतरी दुसरा मार्ग काढून आपण विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला हवा."

"आपण लॉकडाऊन विषयी बोलत असताना ऑफलाईन परीक्षा घेणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी सर्वांना विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची विनंती करतो. जेणेकरुन विद्यार्थी, त्यांचे पालक आणि कुटुंबिय सुरक्षित राहतील. पुढे जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा अधिक मेहनत घेतील. सध्याच्या कठीण काळात जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेसाठी बाहेर पडू इच्छित नाहीत, त्या सर्वांना माझा पाठिंबा आहे," असेही तो म्हणाला. पुढे त्याने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत चांगल्याची आशा करा, असे म्हटले आहे.

Sonu Sood Tweet:

मागील वर्षी कोरोना संकट, लॉकडाऊन काळात सोनू सूदने गरीब, गरजू आणि स्थलांतरीत मजूरांची मोठी मदत केली. त्यानंतरही त्याचे मदतकार्य सुरुच आहे. दरम्यान, सध्याच्या गंभीर परिस्थितीत त्याने विद्यार्थ्यांची वतीने ही विनंती केली आहे.