Neha Dhupia, Sonu Sood & Suresh Raina (Photo Credits: Instagram)

मागील वर्षी सुरु झालेल्या कोविड-19 (Covid-19) संकटात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood) गरीब-गरजूंसाठी देवदूत धरला. या कठीण काळात सोनूने शक्य ती मदत गरीबांना केली. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेतही त्याचे मदतकार्य सुरुच आहे. मात्र त्याची मदत आता केवळ गरीबांसाठी सीमित राहलेली नाही. तर सेलिब्रेटींना मदत करण्यासाठीही तो पुढे सरसावला आहे. भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) आणि बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) यांना सोनूने मदत केली आहे. नेहाला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि सुरेश रैनाला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देत सोनूने त्यांची मदत केली आहे.

भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याने ट्विट करत ऑक्सिजन सिलेंडरची गरज असल्याचे म्हटले होते. त्यावर सोनू सूदने 10 मिनिटांत ऑक्सिजन सिलेंडर पोहचले असा रिप्लाय दिला. त्यानंतर सुरेश रैना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाल्याचा अपडेट टाकत सोनू सूदचे आभार मानले. (मुंबई विमानतळावर मदत मागणाऱ्या व्यक्तीला Sonu Sood ने दिले 'हे' उत्तर, Watch Video)

सुरेश रैना ट्विट:

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिने देखील तिच्या मित्राला उपचारासाठी रेमडेसिवीरची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. तिच्याही मदतीला सोनू सूद धावून गेला. त्यानंतर नेहा  धुपियाने ट्विट करत मदतीसाठी सोनू आणि त्याच्या संस्थेचे आभार मानले आहेत.

कोरोना व्हायरस संसर्गामुळे देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, रुग्णालयात बेड यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यात भरीस भर म्हणून लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरणचा वेगही मंदावला आहे. या कठीण काळात सोनू सूद गरीब-गरजूंच्या मदतीला धावून जात आहे.