Singham Again Box Office Prediction Day 1: 'सिंघम अगेन'ची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून तो करोडो रुपयांचा गल्ला जमवत आहे. अशा स्थितीत चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचे कलेक्शन आणि 'सिंघम अगेन' किती कोटींसह आपले खाते उघडणार याबाबत प्रेक्षकही उत्सुक आहेत.
आता 'सिंघम अगेन' रिलीज होण्यासाठी अवघे काही तास उरले असून सकनीलकच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाने आतापर्यंत 10.52 कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनचा अंदाज वेगवेगळे ट्रेड ॲनालिस्ट वर्तवत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ओपनिंग डे कलेक्शनचा ट्रेंडही येऊ लागला आहे, त्यानुसार 'सिंघम अगेन' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडू शकतो. (हेही वाचा - Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3: 'सिंघम अगेन' कि 'भूल भुलैया 3'... कोणता चित्रपट अॅडव्हान बुकिंगच्या शर्यतीत आघाडी? घ्या जाणून )
पाहा पोस्ट -
₹7.25cr advance expected till midnight today…. Again tomorrow advance will be like a superstorm for Singham Again and SPOT BOOKING will burn the BOX OFFICE as MASS CENTRES will erupt like VOLCANO this FRIDAY….
I am expecting ₹42-₹45cr opening on 1st November 2024… pic.twitter.com/vwEEwdBagl
— Rohit Jaiswal (@rohitjswl01) October 30, 2024
'सिंघम अगेन'चे ओपनिंग डे कलेक्शन
अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन आणि या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता या दोन्ही गोष्टी विलक्षण आहेत. 'सिंघम अगेन'च्या सुरुवातीच्या कलेक्शनचे आकडे वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये वेगळे आहेत. Sacknilk च्या मते, हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 57 कोटींची ओपनिंग घेऊ शकतो. ट्रेड ॲनालिस्ट रोहित जैस्वाल सांगतात की, चित्रपट पहिल्या दिवशी 42-45 कोटींची कमाई करेल. बॉलीवूड हंगामा नुसार, चित्रपट 40 कोटींच्या कलेक्शनसह आपले खाते उघडेल.