नेहा कक्कड़ (Photo Credits: Instagram)

गायिका नेहा कक्कड (Neha Kakkar) च्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. तिचा दमदार आवाज तिची ओळख आहे. त्यामुळे तिच्या गाण्यांची जगभरात धूम आहे. अशामध्ये आता नेहाने तिच्या नावावर एक शानदार रेकॉर्ड केला आहे. दरम्यान जगभरातील लोकप्रिय गायकांना मागे सारून भारतीयांना गर्व वाटेल असा हा एक रेकॉर्ड आता नेहा कक्कडच्या नावावर झाला आहे. आता नेहा कक्कड ही गायिका युट्युब वर सर्च केली जाणारी दुसर्‍या क्रमाकांची गायिका ठरली आहे. तर पहिल्या स्थानी अमेरिकन रॅपर कार्डी बी आहे.

नेहा कक्कड ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये 2019 या वर्षामध्ये युट्युबवर सर्च केलेल्यांच्या गायिकांचा यादीमध्ये समावेश आहे. यात भारतीय गायिका नेहा कक्कड 2 र्‍या स्थानी आहे. नेहाला 4.5 बिलियन लोकांनी युट्युबवर सर्च केलं आहे. तर कार्डी बी ला 4.8 बिलियन लोकांनी सर्च केलं आहे.

नेहा कक्कडची इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Can’t be more thankful!!!! ♥️🙌🏼🥺 Jai Mata Di 🙏🏼 Aapki Nehu 🥰 #NehaKakkar . @youtube @youtubeindia

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

युट्युबवर सर्च करण्यात आलेल्या गायिकांमध्ये अनेक आघाडीच्या गायिकांचा समावेश आहे. पण युजर्सकडून नेहाला सर्च करण्याचं प्रमाण अधिक आहे. नेहा कक्कडने Karol G, Blackpink, Ariana Grande, Marilia Mendonca अशा लोकप्रिय गायिकांना मागे टाकलं आहे. नेहा कक्कडच्या करियरची सुरूवात इंडियन आयडल 6 या सिंगिंग रिएलिटी शोच्या स्पर्धकापासून झाली. त्यावेळी नेहा हा शो जिंकू शकली नाही मात्र आता याच शोच्या परिक्षकांमध्ये नेहाचा समावेश आहे.