Sidharth Shukla ने Shehnaaz Gill सोबत केलं लग्न? सिंदूर आणि मंगळसूत्रासह अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल
Sidharth Shukla, Shehnaaz Gill Viral Photo (PC - Instagram)

Sidharth Shukla And Shehnaaz Gill Viral Photo: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) जेव्हा 'बिग बॉस 13' चा विजेता बनला तेव्हापासून तो नेहमी चर्चेत राहिला आहे. त्याचबरोबर पंजाबच्या कतरिना कैफ शहनाझ गिल (Shehnaaz Gill) सोबत सिद्धार्थचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. शहनाज आणि सिद्धार्थने नेहमीचं लोकांची मने जिंकली आहेत. बिग बॉसनंतर दोघांनी एकमेकांसोबत अनेक प्रोजेक्टवर एकत्र काम केलं. या दोघांनाही चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळत असतं. इतकेचं नाही तर या दोघांची अनेक छायाचित्रे बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांचा एक फोटो पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. बिग बॉसच्या या जोडप्याने लग्न केले आहे की काय? असा प्रश्न हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना पडला आहे.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शहनाजच्या भांगात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. त्याचवेळी सिद्धार्थ शुक्ला शहनाजसोबत तिच्या शेजारी उभा असलेला दिसत आहे. फोटोमध्ये सिद्धार्थ शुक्ला सेल्फी क्लिक करत आहे. हा फोटो पाहून चाहते या दोघांनी गुप्तपणे लग्न केलं असल्याचा अंदाज बांधत आहेत. (वाचा - Loop Lapeta: तापसी पन्नू ने शेअर केले ‘लूप लपेटा’ चे पहिले पोस्टर; पहा फोटो)

सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरणारा हा फोटो फॅन मेड आहे. हा फोटो शहनाज गिलच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये 'हे कोणी केलं?' असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट झालं आहे की, हा फोटो बनावट आहे. मात्र, दोघांना एकत्र पाहून चाहते प्रचंड खूष आहेत. नेटीझन्स हा फोटो पाहून आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.