Sidharth Malhotra-Kiara Advani Break Up: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीचा झाला ब्रेकअप; काय आहे वेगळं होण्यामागचं कारण? जाणून घ्या
Sidharth Malhotra, Kiara Advani (PC - Instagram)

Sidharth Malhotra-Kiara Advani Break Up: सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र, आता या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा वेगळे झाले आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा लवकरचं लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. पण आता त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर येत आहे. बॉलीवूड लाइफ (Bollywood Life) ने स्त्रोताच्या आधारे सांगितले की, 'सिद्धार्थ आणि कियारा वेगळे झाले आहेत. या जोडप्याने एकमेकांना पाहणे बंद केले आहे. मात्र, ब्रेकअपचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.' (हेही वाचा - Indian Police Force: शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामामध्ये होणार सामील, दिसणार पोलिसाच्या भूमिकेत)

सूत्राने पुढे सांगितले की, सिद्धार्थ आणि कियाराची बाँडिंग खूप चांगली होती. चाहत्यांना वाटत होते की, दोघेही लग्न करतील. पण आता आश्चर्यचकित बातमी समोर आली आहे. दोघांमध्ये असे काय घडले, ज्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

कियारा आणि सिद्धार्थचे चित्रपट -

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले होते. ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. आता सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'मिशन मजनू', 'योधा' आणि 'थँक गॉड' सारखे चित्रपट आहेत. त्याच वेळी, कियारा अडवाणीचा 'भूल भुलैया 2' चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. ज्यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.