बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आठवणीत बहिण श्वेता सिंह कीर्ति ने शेअर केला भावनिक व्हिडिओ; Watch Video
श्वेता सिंह कीर्ति आणि सुशांत सिंह राजपूत (Photo Credits: Instagram)

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने वयाच्या 34 वर्षी जगाचा निरोप घेतला. परंतु, सुशांतच्या आठवणी त्याच्या चाहत्यांच्या नेहमी सोबत असणार आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे कुटुंब आजही या दु:खातून बाहेर पडलेले नाही. सुशांतच्या आठवणीत बहिण श्वेता सिंह कीर्ति (Shweta Singh Kirti) ने सोशल मीडिया अकाऊंटवरून भावाचा क्युट असा व्हिडिओ तयार करून शेअर केला आहे.

श्वेता सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला सुशांतच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये सुशांतची प्रत्येक अॅक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे. यात सुशांत पुस्तक वाचताना, टेनिस खेळताना तसेच आपल्या प्रिय डॉगीसोबत खेळताना दिसत आहे. (हेही वाचा - Breathe Into the Shadows Leaked: अभिषेक बच्चन याची पहिली वेबसिरीज 'ब्रीद: इनटू द शॅडोज' पायरसीला बळी; Telegram आणि TamilRockers सर्व एपिसोड्स उपलब्ध)

 

View this post on Instagram

 

My best baby in the world...with eyes filled with dreams ❤️

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on

श्वेताने या व्हिडिओला 'सच अ क्यूटी पाई. स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांसह जगातील सर्वात चांगला बेबी,' असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमधील सुशांत सिंहच्या चेहऱ्यावरील आनंद चाहत्यांना आकर्षित करत आहे. दरम्यान, श्वेता आपल्या कुटुंबासोबत युएसमध्ये राहत आहे. त्यामुळे सुशांतच्या अंत्यसंस्कारालादेखील तिला येता आलं नव्हतं.